वडील-मुलीच्या नात्याला काळीमा, लैंगिक अत्याचार करून 16 महिन्यांच्या चिमुकलीचा खून
विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर हैदराबाद या ठिकाणी वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने अवघ्या 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही. त्या मुलीचा गळा दाबून तिची हत्याही त्याने केली. धक्कादायक बाब ही की बापाच्या या लाजिरवाण्या आणि तेवढ्याच चिड आणणाऱ्या अमानुष कृत्यानंतर पुरावा […]
ADVERTISEMENT

विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर
हैदराबाद या ठिकाणी वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने अवघ्या 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही. त्या मुलीचा गळा दाबून तिची हत्याही त्याने केली. धक्कादायक बाब ही की बापाच्या या लाजिरवाण्या आणि तेवढ्याच चिड आणणाऱ्या अमानुष कृत्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला त्याच्या पत्नीने मदत केली. या प्रकरणी या दोघांनाही सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह हैदराबाद येथे राहात होती. पीडितेची आई आणि लहान मुलगा हे झोपी गेले असताना बापाने मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सिकंदराबाद- राजकोट एक्सप्रेसने पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या मूळगावी राजस्थानकडे मुलीचा मृतदेह घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले.