प्रसाद लाडांच्या शिट्ट्या; चंद्रकांत पाटील, आशिष शेलारांनी धरला ठेका
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपनं चार राज्यात मोठा विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजप सत्तेत विराजमान होत असून, निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र भाजपकडून आज मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. या आनंदोत्सवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठेका धरला. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. भाजपच्या […]
ADVERTISEMENT
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपनं चार राज्यात मोठा विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजप सत्तेत विराजमान होत असून, निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र भाजपकडून आज मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. या आनंदोत्सवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठेका धरला.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात योगी-मोदींचा प्रभाव दिसून आला. उत्तर प्रदेशात भाजपनं प्रचंड बहुमत मिळवत सत्ता प्राप्त केली.
Election Results 2022 : उत्तर प्रदेश ते गोवा… कुणाला किती मिळाल्या जागा? बघा अंतिम निकाल
हे वाचलं का?
दुसरीकडे उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपला बहुमत मिळालं असून, गोव्यातही भाजप पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे. पाचपैकी चार राज्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. महाराष्ट्र भाजपकडूनही विजयाबद्दलचा आनंद व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी (११ मार्च) महाराष्ट्र भाजपच्या वतीने मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर विजयोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह आमदार आणि इतर नेते उपस्थित होते.
ADVERTISEMENT
‘निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?’; शिवसेनेचं मोठं विधान
ADVERTISEMENT
यावेळी भाजप नेते, आमदारांनी गाण्याच्या तालावर ठेका धरल्याचं बघायला मिळालं. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचा ध्वज हातात घेऊन डान्स केला. तर प्रसार लाड यांनी नृत्य करत आणि शिट्ट्या वाजवत विजयाचा आनंद व्यक्त केला. विजयोत्सावाच्या व्हिडीओत अनेकजण नृत्य करताना दिसत आहे.
#WATCH महाराष्ट्र: 4 राज्यों में बीजेपी की जीत होने पर मुंबई के पार्टी कार्यालय के बाहर पार्टी कार्यकर्ता जश्न मनाते हुए दिखे। #AssemblyElections2022 pic.twitter.com/E0xUe4bte1
— ANI_HindiNews (@AHindinews) March 11, 2022
“सिद्धूंनी तर काम चोख केलं, आता नाना मागे राहून कसं चालेल?”
भाजपला कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
गोवा – २०
मणिपूर – ३२
पंजाब – २
उत्तराखंड – ४७
उत्तर प्रदेश – २५५
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT