अमरावती : पुराच्या पाण्यात झाडांवर अडकून पडलेल्या ३०-३५ माकडांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहराला गेल्या काही दिवसांत पावसाने चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे दर्यापूरमधील नदी-नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. दर्यापूरच्या काही भागांमध्ये अजुनही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जामदा गावात पुराच्या पाण्यात काही माकडं झाडावर अडकून पडल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. या माकडांना सुखरुप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय. या घटनेची […]
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहराला गेल्या काही दिवसांत पावसाने चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे दर्यापूरमधील नदी-नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. दर्यापूरच्या काही भागांमध्ये अजुनही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जामदा गावात पुराच्या पाण्यात काही माकडं झाडावर अडकून पडल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. या माकडांना सुखरुप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय.
ADVERTISEMENT
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस पथकातील काही लोकांनी रेस्क्यू बोटीतून जामदा गावात प्रवेश केला. या माकडांना खाली आणण्यासाठी रेस्क्यू टीमने खाण्याचं सामानही नेलं होतं. परंतू आजुबाजूला पाणीच असल्यामुळे कुठे जायचं हे या माकडांना समजत नव्हतं. अशातच रेस्क्यू टीम आल्यानंतर ही माकड बिथरुन या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारायला लागली.
हे वाचलं का?
यावेळी काही माकडं तोल जाऊन पाण्यात पडली. या झाडांवर काही विषारी साप असल्याचीही माहिती गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. त्यामुळे रेस्क्यु टीमने या भागात अडकलेल्या माकडांना सुखरुप बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. या रेस्क्यू ऑपरेशननंतर माकडांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT