मुरबाड : निवृत्त शिपाई झाला डॉक्टर, चुकीचा उपचार करुन घेतला ५ जणांचा जीव
– मिथिलेश गुप्ता, मुरबाड प्रतिनीधी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे पाच जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर मुरबाडच्या धसई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून कामाला होता. निवृत्तीनंतर हा डॉक्टर आपल्या घरातच विनापरवानगी दवाखाना चालवत रुग्णांवर उपचार करत असल्याचं समोर आलं आहे. […]
ADVERTISEMENT
– मिथिलेश गुप्ता, मुरबाड प्रतिनीधी
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे पाच जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर मुरबाडच्या धसई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून कामाला होता. निवृत्तीनंतर हा डॉक्टर आपल्या घरातच विनापरवानगी दवाखाना चालवत रुग्णांवर उपचार करत असल्याचं समोर आलं आहे.
पांडुरंग घोलप असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार-पाच दिवसांपूर्वी राम भिवा आणि त्यांची मुलगी अलका मुकणे हिला ताप आल्यामुळे ते बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपकडे उपचारासाठी गेले होते. परंतू या उपचारानंतर अलकाची प्रकृती आणखीनच खालावली, ज्यामुळे तिला धसईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. परंतू इथेही अलकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून तिला उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं.
हे वाचलं का?
उल्हासनगरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सर्वात आधी अलका मुकणे आणि नंतर तिचे वडील राम भिवा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आदिवासी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने आवाज उठवल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उमेश वाघमोडे यांनी या प्रकाराविरुद्ध तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
ज्यानंतर मुरबाड पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपला अटक केली आहे. यावेळी चौकशीदरम्यान पांडुरंगकडे उपचारासाठी आलेल्या बारकूबाई वाघ, आशा नाईक आणि लक्ष्मण मोरे यांचाही अशाच पद्धतीने मृत्यू झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी आरोपी बोगस डॉक्टरला न्यायालयासमोर हजर केलं असून त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या घटनेत आदिवासी लोकांना आपले प्राण गमवावे लागल्यामुळे आरोपी बोगस डॉक्टरवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT