Milind Deora यांचं एक ट्विट आणि उलटसुलट चर्चांना उधाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कॉंग्रेस (Congress) पक्षात बऱ्याच दिवसांपासून नाराज असलेले माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी आज (9 जून) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही राजकीय उलथापालथ ही कॉंग्रेससाठी एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

या सगळ्या दरम्यान, आता अचानक मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) हे चर्चेत आले आहेत.

मिलिंद देवरा यांनी गुजरात सरकारच्या कामाला अनुकरणीय म्हणवून कॉंग्रेसची चिंता मात्र वाढविली आहे. सचिन पायलट आणि मिलिंद देवरा हे कॉंग्रेसच्या तरूण नेत्यांपैकी एक आहेत. ज्यांची नाराजी ही कायमच चर्चेचा विषय ठरते.

हे वाचलं का?

काँग्रेस सोडून जितिन प्रसाद भाजपमध्ये, UP Election च्या आधी काँग्रेसला झटका

जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या काही वेळानंतरच कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सीएमओ गुजरातचे एक ट्विट शेअर केलं. यावेळी गुजरात सरकारचे काम चांगले असल्याचे वर्णन केले आहे.

ADVERTISEMENT

देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘इतर राज्यांनी अनुकरण करावं असं हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. जर आपल्याला भारतातील आतिथ्य क्षेत्र आणि नोकऱ्यांमधील होणारे नुकसान थांबवायचे असेल तर सर्व राज्यांनी त्वरित अशा पद्धतीने निर्णय घ्यावा.’

ADVERTISEMENT

प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा, नेमकं काय म्हणाल्या काँग्रेस आमदार?

गुजरात सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि वॉटर पार्क यांना प्रॉपटी टॅक्स पूर्णपणे माफ केला आहे. तसेच त्यांना वर्षभरासाठी निश्चित वीज बील ठरविण्यात आले आहे. त्याउपर त्यांना बील न पाठविण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. याच निर्णयाचं देवरांनी कौतुक केलं आहे.

दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी आपले माजी सहकारी जितिन प्रसाद यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर कठोर विधान केले आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ‘माझा विश्वास आहे की कॉंग्रेसने आपले जुने स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कॉंग्रेस हा देशातील एक मोठा पक्ष आहे आणि त्या दृष्टीने तेही हे काम पुन्हा करू शकतात आणि ते त्यांनी केलेही पाहिजे. आपल्याकडे अजूनही असे नेते आहेत ज्यांना ताकद दिली गेली आणि त्यांचा उत्तम प्रकारे उपयोग केल्यास ते चांगला निकाल देऊ शकतात.’

दरम्यान, एक काळ असा होता की, जेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया, (Jyotiraditya Scindia) मिलिंद देवरा, जितिन प्रसाद आणि सचिन पायलट (Sachin Pilot) हे कॉंग्रेसच्या युवा ब्रिगेडचे दिग्गज नेते मानले जात होते. हे नेते यापूर्वीही कॉंग्रेस सरकारमध्ये होते.

या चार नेत्यांपैकी सर्वात आधी सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर काही महिन्यांपूर्वीच सचिन पायलट यांनी देखील पक्षात बंड केलं होतं. आता जितिन प्रसाद हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे.

सुप्रिया सुळेंची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा, पाहा राजधानी दिल्लीत नेमकं काय सुरुयं!

सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांनी अनेकदा पक्षात सुधारणांची मागणीही केली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते खूपदा चर्चेत असतात. आता मिलिंद देवरा यांच्या नव्या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT