आषाढी एकादशी २०२१ : कुंभमेळ्यात जे घडलं ते इथे घडू नये यासाठी प्रयत्न – अजित पवार

मुंबई तक

महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचं स्थान असलेल्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी राज्य सरकारने यंदा नवीन नियमावलीची घोषणा केली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आलेली असून मानाच्या दहा पालखी सोहळ्यांसाठी राज्य शासनाने बस गाड्यांची सोय केली आहे. राज्य सरकारच्या या कठोर नियमांवर वारकरी संप्रदायाने नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलत असताना अजित पवारांनी कुंभमेळ्यात कोरोनाच्या वेळी जे झालं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचं स्थान असलेल्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी राज्य सरकारने यंदा नवीन नियमावलीची घोषणा केली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आलेली असून मानाच्या दहा पालखी सोहळ्यांसाठी राज्य शासनाने बस गाड्यांची सोय केली आहे. राज्य सरकारच्या या कठोर नियमांवर वारकरी संप्रदायाने नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलत असताना अजित पवारांनी कुंभमेळ्यात कोरोनाच्या वेळी जे झालं ते इथे होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं.

“वारीची परंपरा ही वर्षानुवर्षे सुरु आहे त्यामुळे ती टिकलीच पाहिजे पण सोबत आपल्याला कोरोनाच्या सावटाचा विचार करायचा आहे. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत सर्व अधिकारी, वारकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निर्बंध शिथील केले आहेत. वाखरीला गेल्यावर पायी चालत जाण्याची मूभा दिली आहे. परंतू कुंभमेळ्यानंतर कोरोनाचा जसा प्रसार झाला तसं इकडे होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.”

वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आम्हाला आदर आहे परंतू राज्याच्या आरोग्य हिताकडे पाहणंही गरजेचं आहे. तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे योग्य तो विचार करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीही काही वारकऱ्यांच्या मनात शंका असतील किंवा त्यांना काही भावना मांडायच्या असतील तर विभागीय आयुक्तांना त्यांच्या चर्चा करण्यास सांगू अशी माहिती अजित पवारांनी दिली.

असा असेल यंदाचा पालखी सोहळा –

हे वाचलं का?

    follow whatsapp