ड्रग्ज प्रकरणात अभिनेते दिलीप ताहिल यांच्या मुलाला अटक

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एक मोठी कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईमध्ये बॉलिवूडचे अभिनेते दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहिलला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांच्या वांद्र्यातील अँन्टी नारकोटिक्स सेलकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ध्रुव ताहील हा एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता आणि त्या ड्रग्ज पेडलरकडून ध्रुव वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. त्याचप्रमाणे ध्रुवने ड्रग्जसाठी पैसेही दिल्याचं समोर आलं आहे.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला एनसीबीच्या ताब्यात

हे वाचलं का?

अँन्टी नारकोटिक्स सेलने ड्रग्ज पेडलर मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी 35 ग्रॅम एमडी ड्रग्ज सुद्धा जप्त केलं होतं. यानंतर मुजमिल याचा मोबाइल पोलिसांकडून तपासण्यात आला. यावेळी ध्रुव ताहील याच्यासोबतचे व्हॉट्सअप चॅट्स पोलिसांच्या समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव 2019 ते मार्च 2021 पर्यंत ड्रग्ज पेजलर्सच्या संपर्कात होता. यानंतर त्यानंतर आज ध्रुव याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT