केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करणार
अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. कारण तिची न्यायालयीन कोठडी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज तिच्या न्यायालयीन कोठडी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर केतकीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात […]
ADVERTISEMENT
अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. कारण तिची न्यायालयीन कोठडी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज तिच्या न्यायालयीन कोठडी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर केतकीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
आता या अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात केतकी चितळे जामिनासाठी अर्ज करणार आहे. आत्तापर्यंत तिच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एकाही गुन्ह्यात तिला जामीन मिळालेला नाही. अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात केतकीला ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता केतकी चितळेला ७ जूपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे वाचलं का?
ज्या प्रकरणी तिच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते प्रकरण २०२० मधलं आहे. आता काही दिवसांपूर्वीच तिने शरद पवारांबाबत तिने जी पोस्ट केली होती त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात तिला अजूनही दिलासा मिळालेला नाही.
ADVERTISEMENT
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आता मुंबई पोलीसही केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तसंच आता केतकी चितळेच्याबाबतीतही होण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात १५ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
ADVERTISEMENT
.
केतकीने काय युक्तिवाद केला होता?
केतकीने कोर्टात युक्तीवाद करताना हे म्हटलं होतं की जी पोस्ट मी शेअर केली आहे, ती पोस्ट माझी नाही. सोशल मीडियातून कॉपी करून मी ती पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असाही प्रश्न केतकीने विचारला होता. एवढंच नाही तर मी पोस्ट डिलिट करणार नाही तो माझा अधिकार आहे असंही तिने कोर्टाला सांगितलं होतं.
अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर खासदार शरद पवार यांच्याबद्दल दि . १३ मे रोजी बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता . ज्यात संत तुकाराम यांचा देखील उल्लेख करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून केतकी चितळेविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT