Taliban-Afghanistan Conflict : अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी राजवट?; काबूलमध्ये काय घडतंय… जगाच्या लागल्या नजरा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पुन्हा युद्ध लादू देणार नाही, असं म्हणत सत्ता न सोडण्याचा इशारा दिला होता. मात्र, २४ तासांतच तालिबानी बंडखोरांनी राजधानी काबूलच्या सीमांना सर्व बाजूंनी वेढा देत अशरफ घनी यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं.

ADVERTISEMENT

गेल्या २४ तासांत काय झालं?

अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात गृहयुद्ध उफाळून आलं. गेल्या २४ तासांत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबानला तोंड देण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, तालिबानी बंडखोरांनी आक्रमक होत काबूलच्या दिशेनं कूच केली. रविवारी सकाळी तालिबानी बंडखोरांनी काबूलची नाकाबंदी केली. तर काही ठिकाणी बंडखोर शहरात घुसल्याचंही समोर आलं.

हे वाचलं का?

काबूल शहराला वेढा दिल्यानंतर तालिबाननं शांततेत सत्तांतर केलं जावं असं म्हटलं. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी नमती भूमिका घेतली. त्यानंतर तालिबानचं शिष्टमंडळ अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात दाखल झालं. काबूलमध्ये अतिशय वेगानं या घडामोडी घडत असून, त्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

ADVERTISEMENT

अली अहमद जलाली यांच्याकडे येणार सत्तेची सूत्रं?

ADVERTISEMENT

तालिबानकडून शांततेत सत्ता हस्तांतरांची मागणी झाल्यानंतर चर्चा सुरू झाली. तालिबान संघटनेचे क्रमांक दोनचे नेते मुल्ला अब्दुल घनी बरादारही चर्चेसाठी काबूलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त आहे. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे पुढील काही तासांत राजीनामा देणार असल्याची माहितीही समोर आली आहे. अशरफ घनी हे राजीनामा देऊन अफगाणिस्तानचे माजी गृहमंत्री अली अहमद जलाली यांच्याकडे सत्ता सुपूर्द करणार असल्याची माहिती असून, याबद्दल अद्याप अधिकृतरित्या कुणीही भाष्य केलेलं नाही.

अमेरिकनं पाठवलं तीन हजार सैन्य

तब्बल २० वर्षांपूर्वी अमेरिकेनं अफगाणिस्तान हस्तक्षेप करून तालिबानला सत्तेवरून हुसकावून लावलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या सैन्यानं माघार घेताच तालिबाननं पुन्हा सत्तेसाठी बंड पुकारलं. बहुतांश प्रांत आणि महत्त्वाची शहरं ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं काबूलला वेढा दिला. काबूलला वेढा देताच अमेरिकेनं काबूलमधील अमेरिकनं दूतावास रिकामा करण्यासाठी तीन हजार सैन्य पाठवलं होतं. दुसरीकडे ब्रिटननेही ६०० सैनिक पाठवले असून, नागरिकांना मायदेशात नेण्याचं काम सुरू केलं आहे. भारतानंही नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT