RSS ची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होणार बंगळुरूत

मुंबई तक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १९ आणि २० मार्चला बंगळुरूत होणार आहे. या प्रतिनिधी सभेला यंदा विशेष महत्त्व यासाठी आहे की या सभेत सरकार्यवाह पदासह नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. संघामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड ज्या प्रतिनिधी सभेत होत असते आणि दर वर्षी देशातील इतर भागात होणारी प्रतिनिधी सभा दर तीन वर्षांनी नागपुरात होते आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १९ आणि २० मार्चला बंगळुरूत होणार आहे. या प्रतिनिधी सभेला यंदा विशेष महत्त्व यासाठी आहे की या सभेत सरकार्यवाह पदासह नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. संघामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड ज्या प्रतिनिधी सभेत होत असते आणि दर वर्षी देशातील इतर भागात होणारी प्रतिनिधी सभा दर तीन वर्षांनी नागपुरात होते आणि याच प्रतिनिधी सभेत पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते.

यंदा प्रथमच नागपूरच्या बाहेर म्हणजेच बंगळूरू येथे प्रतिनिधी सभा होणार आहे.या प्रतिनिधी सभेत संघ परिवारातील सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होतात ज्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर मंडळी समाविष्ट असतात.

प्रभू रामाच्या देशात पेट्रोल 93 रुपये लीटर, भाजप खासदाराची टीका

संघाचे सरकार्यवाह हेच संघाचे मुख्य प्रशासक असतात आणि सरसंघचालक हे मार्गदर्शक असतात. संघाच्या या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये गेल्या एक वर्षांमध्ये संघाच्या सेवकार्याचा आढावा घेण्यात येणार असून अन्य काही महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर होणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp