मुंबईकरांना आता नवरात्र उत्सवाचे वेध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

गणेशोत्सव संपल्यानंतर आता मुंबईत नवरात्र उत्सवाची तयारी सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

मुंबईतल्या कार्याशाळांमध्ये मूर्तीकारांची देवीच्या मूर्ती बनवण्याची लगबग सुरु आहे.

ADVERTISEMENT

७ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे, त्यामुळे मूर्तीकार आपल्या हातात असलेलं काम संपवण्याच्या तयारीत आहेत.

ADVERTISEMENT

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मूर्तींच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. परंतू प्रयत्न करत राहणाऱ्या लोकांच्या झोळीत देव यश टाकतो असं म्हणतात…म्हणूनच की काय हे मूर्तीकार प्रामाणिकपणे मेहनत घेऊन आपलं काम करत आहेत.

काही मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरु असून आता या मूर्तींना सुंदर आणि मनमोहक असे रंग देण्यात येतील.

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवावरही कोरोनाच्या नियम आणि निर्बंधांचं सावट आहे

सरकारने अद्याप नवरात्र उत्सवासाठीची नियमावली जाहीर केलेली नाही. परंतू गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मूर्तीकारही सरकारच्या या नियमांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

देशासह राज्यावरचं कोरोनाचं सावट लवकरात लवकर दूर कर असं मागणं हे मूर्तीकार देवीकडे मागत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT