मोदींविरोधात शरद पवारांची Powerful खेळी, भाजपविरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थातच भाजपविरोधातला पक्षांची मोट बांधण्यास शरद पवारांनी सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार आहे मात्र शरद पवार यांनी आत्तापासूनच तिसरी आघाडी उभारण्याचे संकेत दिले आहेत असंच गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी सांगत आहेत. गेल्याच आठवड्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती हे […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थातच भाजपविरोधातला पक्षांची मोट बांधण्यास शरद पवारांनी सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार आहे मात्र शरद पवार यांनी आत्तापासूनच तिसरी आघाडी उभारण्याचे संकेत दिले आहेत असंच गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी सांगत आहेत. गेल्याच आठवड्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती हे सांगण्यात आलं तरीही या भेटीची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. रविवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिलं. या पत्रात भाजपसोबत जाणं कसं हिताचं आहे हे त्यांनी सांगण्याचा त्यांच्या परिने प्रयत्न केला.
अशा सगळ्या घडामोडी एकामागोमाग एक घडत असतानाच शरद पवार सोमवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले. शरद पवार दिल्लीला गेले आणि त्याची चर्चा महाराष्ट्रात झाली नाही तरच नवल. दिल्लीला गेल्यानंतर दुपारी बातमी आली की त्यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सगळ्या चर्चांना उधाण आलं. या बातम्या संपत नाहीत तोच आता ही बातमी आली आहे की मंगळवारी शरद पवार यांनी भाजपविरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलवली आहे.
आतली बातमी: शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीतील Inside Story… जशीच्या तशी!
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या बैठकीला यशवंत सिन्हा, पवन वर्मा, संजय सिंग, डी राजा, फारुख अब्दुल्ला, माजिद मेमन, संजय झा, सुधींद्र कुलकर्णी, खासदार वंदना चव्हाण, आशुषतोष , के.सी. सिंग, अर्थतज्ज्ञ अरूण कुमार, प्रीतीश नंदी या सगळ्यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीनंतर ते काही मोठी घोषणा करणार का? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांनी ही बैठक बोलावली आहे ती देखील प्रशांत किशोर यांची भेट झाल्यानंतर. दोन आठवड्यात शरद पवार यांनी दोनदा घेतलेली प्रशांत किशोर यांची भेट आणि महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत जाणार का अशी चर्चा प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळेही सुरू झाली आहे. अशात या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे ठामपणे सांगत आहेत की आमच्या सरकारला काहीही धोका नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही हे स्पष्ट केलं आहे की प्रताप सरनाईक यांनी पाठवलेल्या पत्राचा वेगळा अर्थ काढू नका महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. अशा सगळ्या गोष्टी सुरू असताना शरद पवार दिल्लीत जातात, तिथे प्रशांत किशोर यांची भेट घेतात आणि मग भाजपविरोधी पक्षांची बैठक बोलवतात. या सगळ्याकडे राजकीय दृष्ट्याच पाहिलं जाणार आहे.
2024 मध्ये मोदींना आणि पर्यायाने भाजपला रोखायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. विरोधक विखुरलेले असतील तर भाजपचं यश सोपं होईल. महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग हा शरद पवारांनी यशस्वी करून दाखवला. बेरजेचं गणित ही त्यांच्या राजकारणाची शैली आहे. अशात आता राष्ट्रीय पातळीवर ते सगळ्या भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणतील का? ती मोट बांधण्यात यशस्वी होतील का? हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT