Mumbai : आंतरराज्य Child Trafficking चं रॅकेट उद्ध्वस्त, चार जण अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत एका आंतरराज्य Child Trafficking टोळीचं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी एका मुलाचं अपहरण केलं होतं. 31 ऑगस्टला हे मूल पळवण्यात आलं होतं आणि 3.5 लाखाला या मुलाची विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी या लहान मुलाची सुटका करून त्याची आणि आणि आईची भेट करून दिली आहे. Child Trafficking प्रकरणी एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

चार आरोपींपैकी 2 जण मुंबईतले आहेत. तर इतर दोघेजण तेलंगणचे आहेत. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ज्या लहान मुलाचं अपहरण झालं होतं त्या लहान मुलाला त्याच्या आईकडे पोलिसांनी सोपवलं आहे. त्यामुळे आईचा जीव भांड्यात पडला आहे.

लहान मुलं खेळत असताना त्यांना चॉकलेट किंवा खेळाचं आमिष दाखवून किंवा आईचं नाव सांगून पळवून नेण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. अशाच प्रकारे या अगदी लहान मुलाचं अपहरण मुंबईत झालं होतं. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. ज्यानंतर पोलीस या प्रकरणी कसून तपास करत होते. तो तपास करत असतानाच पोलिसांनी या रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT