अनिल देशमुखांचा पाय खोलात? सिताराम कुंटेंचा ईडीसमोर महत्वपूर्ण खुलासा

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आता आणखी खोलात जाताना दिसत आहे, राज्याचे माजी अतिरीक्त गृह सचिव सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची Unofficial List दिल्याचं सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये ईडीने सिताराम कुंटे यांच्या स्टेटमेंटचा वापर केला आहे.

परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख

हे वाचलं का?

“गृहमंत्री अनिल देशमुख त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची Unofficial List पाठवायचे. यानंतर ही यादी Police Establishment Board च्या सर्व सदस्यांना दाखवली जायची, आणि यानंतर मी प्रत्येक सदस्याला ही यादी गृहमंत्र्यांनी पाठवल्याचं सांगायचो. अनिल देशमुखांनी दिलेल्या यादीतील नावांची नियमांप्रमाणे पडताळणी व्हायची. यानंतर ज्या कोणाचं नाव योग्य वाटायचं त्याच्या नावाची शिफारस व्हायची. बहुतांश वेळा देशमुखांनी पाठवलेल्या Unofficial List मधल्या नावांची शिफारस केली जायची अशी माहिती कुंटे यांनी ईडीला दिली आहे.

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब मला देत होते, अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

देशमुखांकडून देण्यात आलेल्या Unofficial List बद्दल Police Establishment Board च्या बैठकीमध्ये गुप्तता पाळली जायची असंही कुंटे यांनी ईडीला दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितलं आहे. कुंटे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही अनिल देशमुखांनी पाठवलेली Unofficial List का स्विकारली असा प्रश्न विचारला होता.

ADVERTISEMENT

वाझेला सेवेत घेण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव होता; परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट

ज्याला उत्तर देताना कुंटे यांनी, देशमुख हे वरिष्ठ मंत्री असून मी त्यांच्या हाताखाली काम करत असल्यामुळे मी ती यादी स्विकारायचो. त्यांच्या हाताखाली काम करत असल्यामुळे त्यांनी दिलेली यादी मी नाकारु शकत नव्हतो असं उत्तर दिलं. ज्या Unofficial List चं कुठेही रेकॉर्ड ठेवलं जाऊ शकत नाही अशा लिस्टवर PEB मध्ये चर्चा का व्हायची असा प्रश्न विचारला असता कुंटे यांनी, आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही असं सांगितलं. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अनिल देशमुख हे योग्य व्यक्ती असल्याचंही कुंटे यांनी सांगितलं.

…म्हणून सचिन वाझेने अनिल देशमुखांबद्दलचं स्टेटमेंट बदललं- परमबीर सिंग यांचा धक्कादायक खुलासा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT