साडीमुळे प्रवेश न देणाऱ्या दिल्लीतल्या ‘त्या’ रेस्टॉरंटला लागलं टाळं
साडी नेसून आलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या दिल्लीतल्या अक्विला रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीच्या अंसल प्लाझा येथील या रेस्टॉरंटला दिल्ली नगर निगमने रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस बजावली आहे. यानंतर या रेस्टॉरंटला टाळं लागलं आहे. अक्विला रेस्टॉरंटमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेला साडी नेसून आल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता. यावेळी महिलेने बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल […]
ADVERTISEMENT
साडी नेसून आलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या दिल्लीतल्या अक्विला रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीच्या अंसल प्लाझा येथील या रेस्टॉरंटला दिल्ली नगर निगमने रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस बजावली आहे. यानंतर या रेस्टॉरंटला टाळं लागलं आहे.
ADVERTISEMENT
अक्विला रेस्टॉरंटमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेला साडी नेसून आल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता. यावेळी महिलेने बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनीही याविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेने रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस बजावली असल्यामुळे हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. दरम्यान, या नोटीसमध्ये अलीकडे घडलेल्या घटनेचा उल्लेख नाही. सदर रेस्टॉरंट हेल्थ ट्रेड लायसन्सशिवाय सुरु असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय.
दिल्ली महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “हे रेस्टॉरंट वैध परवान्याशिवाय चालत होते. प्रशासनाने प्रथम नोटीस बजावली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.” अक्विला रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात साडी नेसून आलेल्या महिलेला प्रवेश नाकारला होता. साडी स्मार्ट ड्रेसमध्ये येत नसल्याचं सांगत कर्मचाऱ्यांनी महिलेला प्रवेश नाकारला होता.
हे वाचलं का?
साडी नेसलेल्या महिलेला रेस्तराँमध्ये नाकारला प्रवेश, कारण…; व्हिडीओ झाला व्हायरल
दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात या रेस्टॉरंटच्या मालकाने सार्वजनिक जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचंही दिसून आलं. ज्यानंतर २४ सप्टेंबरला महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात येऊन हे रेस्टॉरंट बंद करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
जाणून घ्या काय होता हा संपूर्ण वाद?
ADVERTISEMENT
गेल्या आठवड्यात एका फेसबुक पोस्टमध्ये एका महिलेने दावा केला होता की तिला अक्विला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला. कारण तिने साडी नेसली होती. या महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादाचा व्हिडिओही पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये एका कर्मचाऱ्याला साडी हा स्मार्ट ड्रेस नसल्याचे सांगताना दाखवण्यात आले. त्याचवेळी रेस्टॉरंटने सांगितले की, महिलेने आमच्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले. त्यांच्या नावावर रिजर्वेशन नसल्याने आम्ही त्यांना थांबायला सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT