खुशखबर! जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त; तुमच्या शहरातही भाव घसरले, जाणून घ्या

मुंबई तक

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत कधी वाढ झाली, तर कधी सोन्याचे भाव घसरल्याचं समोर आलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली स्वस्त?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत कधी वाढ झाली, तर कधी सोन्याचे भाव घसरल्याचं समोर आलं. आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जून 2025 ला सोन्याच्या दरात जवळपास 770 रुपयांनी घट झाली आहे.

यामुळे राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97460 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या भावात 700 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89350 रुपये झाले आहेत. चांदीच्या किंमतीतही मागील आठवड्यापासून चढ-उतार होत असल्याचं समोर आलं. आज चांदीच्या पति किलोग्रॅमचे दर 99900 रुपयांवर पोहोचले आहेत. 

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?