फूस लावून अल्पवयीन मुलीला नेलं अन् केला गँगरेप! नराधमाने मित्रांना बोलावून व्हिडीओ बनवला अन्...

मुंबई तक

Minor Girl Gangrape Case :  कर्नाटकच्या बेलगावी मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

बलात्कार पीडितेची प्रतीकात्मक प्रतिमा
बलात्कार पीडितेची प्रतीकात्मक प्रतिमा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे गजाआड

point

पोलिसांनी आरोपींवर केली कठोर कारवाई

point

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Minor Girl Gangrape Case :  कर्नाटकच्या बेलगावी मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता आणि सर्व आरोपी बेलगावी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने पीडित मुलीसोबत मैत्री केली आणि नंतर फूस लावून तिला सोबत घेऊन गेला.

त्यानंतर नराधमाने मित्रांसोबत मिळून अल्ववयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पीडितेला ब्लॅकमेल केलं. अशाप्रकारे तीन अन्य आरोपींनी पुन्हा पीडितेवर गँगरेप केला.
पोलिसांनी याप्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे.

हे ही वाचा >> रिक्षाच्या भाड्यावरुन वादातून 24 वर्षांपूर्वी झाली होती हत्या, आरोपीला तब्बल 24 वर्षानंतर... पोलिसांनी कसा केला तपास?

अल्पवयीन आरोपींचाही समावेश, पोलिसांनी म्हटलं..

यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. सहाव्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. बेलगावी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी म्हटलं की, मुख्य आरोपी (A1 आणि A2) ने हा गुन्हा केला. वेगवेगळ्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणाचा कसून तपास केला जात आहे आणि पीडितेला न्याय देण्यासाठी आवश्याक ती पावले उचलली जात आहेत. 

बिहारमध्येही सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. पीडितेचा पटनाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं की, अल्पवयीन मुलीसोबत 26 मे रोजी मुजफ्फरपुर येथील तिच्या गावात अत्याचार करण्यात आला. पीडिता गंभीर जखमी झाल्याने तिला पटनाच्या मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हे ही वाचा >> रिक्षाच्या भाड्यावरुन वादातून 24 वर्षांपूर्वी झाली होती हत्या, आरोपीला तब्बल 24 वर्षानंतर... पोलिसांनी कसा केला तपास?

झारखंडच्या बोकारोमध्येही सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. येथील सेक्टर-12 परिसरात 4 नराधमांनी पती-पत्नीला जबरदस्ती दारू पाजली होती. त्यानंतर या आरोपींनी पतीला बांधून ठेवलं होतं. त्यानंतर पतीसमोरच या नराधमांनी पत्नीवर सामूहिक बलात्कार केला होता. पोलिसांनी या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत चार ऑटो चालक आरोपींवर अटकेची कारवाई केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp