बीड: अंबाजोगाईत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 51 लाखाचा मुद्देमाल जप्त!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड: अंबाजोगाई तालुक्यातील अवैध धंदयावर पोलिसांनी वक्रदृष्टी ठेवली असून रात्री शेतातील जुगार अड्डयावर अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने मोठी धाडसी कारवाई करत छापा टाकून नगदी रक्कमेसह 51 लाखाचा मुद्देमाल जप्तीसह बारा जणांना अटक करण्यात आली असून यात शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

फिर्यादी पोलीस नाईक तानाजी तागड यांनी दिलेल्या तक्रारीत दिनांक 25 जानेवारी रोजी 7.45 वाजता मौजे साकूड शिवारात दत्ता मानाजी शेप रा. शेषवाडी याच्या शेतातील घराच्या समोरील व्हरांडयात तीन पत्तीवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळ खेळताना अनेक जण आढळून आले.

जुगार खेळताना पोलिसांनी यांना रंगेहाथ केली अटक

हे वाचलं का?

  1. श्रीमंत साहेबराव गोरे (वय 69 वर्ष रा.कारी ता. धारूर)

  • श्रीकृष्ण श्रीरामजी सोनी (वय 62 वर्ष रा.ओमशांती अंबाजोगाई)

  • ADVERTISEMENT

  • जनार्धन कोडींबा उमाटे (वय 55 वर्ष, रा. पोखरी ता. अंबाजोगाई)

  • ADVERTISEMENT

  • विश्वनाथ रानबा दौंड (वय 40 वर्ष, रा. दौंडवाडी ता. परळी)

  • बाळकृष्ण विठ्ठल लांडे (वय 38 वर्ष, घाटसावळी ता. बीड)

  • नानासाहेब दत्ताजय कदम (वय 42 वर्ष, रा . घाटनांदुर ता. अंबाजोगाई)

  • प्रकाश चव्हाण (वय 38 वर्ष, रा. घाटसावळी ता. बीड)

  • ज्ञानोबा विठ्ठलराव तांदळे (वय 52 वर्ष, रा. सारडगांव ता. परळी)

  • गजानन माणिकराव आरोळे (वय 44 वर्ष, रा. डी.पी.एस.कॉलनी, ता . परळी)

  • संभाजी भानुदास शिंदे (वय 41 वर्ष, रा. निजुड ता.माजलगांव)

  • संतोष तात्या केकाण (वय 40 वर्ष, रा . चौभारागल्ली ता. अंबाजोगाई)

  • या छाप्यात नगदी एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांसह एकण 51,17,350 वर्णनाचे व किंमतीचे नगदी रोख रक्कम, मोबाइल फोन चारचाकी गाड्या व जुगाराचे साहित्य मिळून आले. यावेळी पंचनामा करुन बारा आरोपींना अटक करण्यात आली असून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात माजी सरपंच, शहरातील नामचीन व्यापारी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बीड: जुगार खेळणारे ते मास्तर नेमके कोण?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय…

    ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चौधर, पो.ना.तानाजी तागड, बीट अंमलदार मोरे, शुभम राउत, नाना राऊत, शिनगारे, रामेश्वर सुरवसे, पठाण देवकते यांनी केली असून या प्रकरणाचा अधिक तपास अंमलदार मोरे हे करत आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT