Bigg Boss Marathi 4 Finale : ‘अक्षय केळकर’ ठरला ‘बिग बॉस मराठी 4 ’चा विजेता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bigg Boss Marathi 4 Finale : अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी 4’ चा विजेता ठरला आहे. टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये मागील अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेरीस प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि ‘बिग बॉस मराठी’चे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी विजेता म्हणून अक्षय केळकरच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी कॅप्टन्सी कार्यादरम्यान ठरल्यानुसार चौथ्या पर्वाच्या विजेत्या अक्षयला ट्रॉफी आणि आठ लाख रुपये मिळणार आहेत.

कशी झाली स्पर्धा ?

स्पर्धेच्या सुरुवातीला बझर राऊंडमध्ये राखी सावंत बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेही आऊट झाली. त्यानंतर किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर यांच्यात जुगलबंदी रंगली होती. मात्र त्याच्या पुढच्याच टास्कमध्ये किरण मानेही बाहेर पडले. त्यामुळे आजच्या दिवशी टॉप 2 मध्ये अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर राहिले होते. शेवटी अक्षय केळकरने बाजी मारत ट्रॉफीवर नावं कोरलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राखी सावंत ९ लाख घेऊन पडली घराबाहेर :

नदीया पार सजन का ठाणा…. या गाण्यावर राखी थिरकली आणि चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला. मात्र बझर राऊंडमध्ये तिने मोठी हिंमत करत ९ लाख रुपये घेतले आणि बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. “हे मी माझ्या आईसाठी हे करते आहे” असं राखीनं सांगितलं. तसंच हे सांगताना तिला अश्रु अनावर झाले होते.

ADVERTISEMENT

अमृता धोंगडे झाली आऊट :

बझर राऊंडमध्ये राखी सावंत बाहेर पडल्यानंतर नवा टास्क सुरु झाला होता. या टास्कमध्ये उरलेले ४ स्पर्धक एका बॉक्स मध्ये उभे राहिले होते आणि प्रत्येक बॉक्सच्या बाहेर दिवे लावले होते. ज्याच्या बॉक्स बाहेरचा दिवा बंद होईल तो स्पर्धक घराबाहेर असा नियम होता. अखेर या टास्कमधून अमृता धोंगडे आऊट झाली.

ADVERTISEMENT

किरण माने बाहेर पडले :

राखी सावंत आणि अमृता धोंगडे बाहेर पडल्याने स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अशातच किरण माने यांनाही स्पर्धेतून निरोप देण्यात आला. या टास्कमध्ये तिघांना तीन दरवाज्यांसमोर उभं करण्यात आलं होतं आणि एक दरवाजा निवडण्याचा पर्याय दिला. ज्याचा दरवाजा उघडेल तो घराच्या बाहेर असा टास्क होता. यात किरण माने यांचा दरवाजा उघडला आणि ते घराबाहेर पडले. आम्ही शंभर दिवस एकत्र राहिलो याचा खूप आनंद आहे. असं म्हणतं साश्रुनयनांनी त्यांनी निरोप घेतला.

नव्या स्वरुपात आलं होतं ‘बिग बॉस मराठी-4’ :

यंदा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबरला झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाले. या दरम्यानच्या काळात अनेक नवे ट्वीस्ट पाहायला मिळाले होते. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दुहेरी एलिमिनेशन पाहायला मिळालं होतं.

या सीझनमध्ये अनेक गोष्टी स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठीही नव्या होत्या. यात मग अगदी घराच्या सजावटीपासून ते राखी सावंतच्या एन्ट्रीपर्यंतच्या गोष्टींमुळे प्रेक्षकांना धक्के मिळाले होते. त्यानंतर तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले होते. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश होता.

यापूर्वी २०१८ ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्याचा मान मेघा धाडे हिने पटकावला होता. त्यानंतर मे २०१९ रोजी ‘बिग बॉस मराठी’चे दुसरे पर्व सुरू झाले होते. शिव ठाकरे याने दुसऱ्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला होता. तर सप्टेंबर २०२१ रोजी ‘बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू झाले होते. या पर्वात विशाल निकम याने विजेता होण्याचा मान पटकावला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT