पवारांनी कितीवेळा रंग बदललेत?; भाजपचं इतिहासाचे दाखले देत प्रत्युत्तर

मुंबई तक

गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची राज्यभर चर्चा होत आहे. राज ठाकरेंनी भाजपचा उल्लेख न करता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर तोफ डागली. त्यांच्या भाषणाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे भाजपची बी टीम झाल्याची टीका होऊ लागली आहे. राज ठाकरेंनी रंग बदलल्याचंही बोललं जात असून, राष्ट्रवादीच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची राज्यभर चर्चा होत आहे. राज ठाकरेंनी भाजपचा उल्लेख न करता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर तोफ डागली. त्यांच्या भाषणाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे भाजपची बी टीम झाल्याची टीका होऊ लागली आहे. राज ठाकरेंनी रंग बदलल्याचंही बोललं जात असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर होत असलेल्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या भूमिकेत आणि आताच्या भूमिकेत प्रचंड बदल झाला असल्याचं सांगत ते भाजपची बी टीम बनल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत आहे. या राजकीय वादात आता भाजपनेही उडी घेतलेली असून, भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी थेट शरद पवारांवरच नेम धरला.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राष्ट्रवादीला सवाल केला आहे. त्यांनी शरद पवारांच्या इतिहासातील वेगवेगळ्या निर्णयांचे दाखलेही दिले आहेत.

“….रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे, पण शरद पवार यांचं काय? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली.”

हे वाचलं का?