Shiv Sena vs BJP: ‘हे सरकारच्या प्रमुखाचं नव्हे तर एका गँग प्रमुखाचं भाषण’, मुनगंटीवारांची बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विकास राजूरकर

ADVERTISEMENT

चंद्रपूर: ‘शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे सरकार प्रमुखाचे नव्हे तर एका गॅंग प्रमुखाचे भाषण होते.’ अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

‘दोन दिवसाआधी आपण गुंड आहोत म्हणून सांगितले आणि आता काँग्रेसला स्वबळाच्या नाऱ्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा, हिंदुत्वाची व्याख्या भारताला आधीच कळली आहे तुम्ही सांगण्याची गरज नाही, मात्र शेवटी शिवसेनेची त्यातली भूमिका कोणती आहे?’ असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कालच्या (19 जून) भाषणात विरोधकांचा बराच समाचार घेतला. पण उद्धव ठाकरेंच्या याच भाषणावर आता भाजप नेते देखील पलटवार करु लागले आहेत.

पाहा सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर नेमकी काय टीका केली:

ADVERTISEMENT

‘हे सरकार प्रमुखाचं भाषण होतं की, एका गँग प्रमुखाचं होतं? दोन दिवसाअगोदर आम्ही गुंड आहोत अशी भाषा करायची आणि आज काँग्रेसने स्व-बळावर लढायची भाषा केल्यानंतर त्यांना जोड्याने मारलं जाईल अशी भाषा करायची हे आश्चर्यजनक आहे.’

ADVERTISEMENT

‘खरं तर या भाषणामध्ये हिंदुत्वाची व्याख्या काय… म्हणजे हे हिंदुत्वाची व्याख्या काय हे या देशातील जनतेला अजूनही समजलेलं नाही हे सांगण्याचा प्रयत्न होत होता. हिंदुत्व हे म्हणजे सहिष्णुता आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे या देशातल्या सर्व हिंदूंना याची जाणीव आहे.’

शिवसेनेचा जन्म कोणाचीही पालखी वाहण्यासाठी झालेला नाही, स्वाभिमानाने पुढे जाऊ – उद्धव ठाकरे

‘तुमची भूमिका काय आहे हिंदुत्वाबद्दल याविषयी अपेक्षा होती. पण त्यासंदर्भात भाष्य न करता त्या भाषणामध्ये वर्धापन दिनानिमित्ताचं भाषण हे पूर्णपणे खुर्चीच्या आसपास भरकटत होतं आणि खुर्चीच्या आसपास लक्ष ठेवून वर्धापन दिनामध्ये आपल्या शिवसैनिकांना खुर्चीच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या उदात्तीकरण करण्याच्या संदर्भातील भाषण आज बघितलं.’

‘मला वाटतं हे सरकारच्या प्रमुखाचं नव्हे तर एका गँग प्रमुखाचं भाषण होतं.’ अशी अत्यंत बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

पाहा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात काय म्हटलं होतं:

शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनानिमीत्त व्हर्च्युअल भाषणात बोलत असताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली होती.

‘सत्ता गेल्यामुळे काहींच्या पोटात दुखतंय, मुरडा आलाय. पण त्यावर उपचार करण्यासाठी मी काही डॉक्टर नाही. गेली 55 वर्ष शिवसेना प्रत्येक पक्षाचे रंग आणि अंतरंग पाहून मोठी झाली आहे. अनेक जणांना शिवसेनेच्या हिंदुत्वाची चिंता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्यानंतर आम्ही हिंदुत्व सोडलं अशी टीका होते आहे. पण हिंदुत्व हे कोणाचंही पेटंट नाही. तो काही कपड्याचा भाग नाही की नेसला आणि सोडून दिला. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यामुळे कोणालाही आमच्या हिंदुत्वाची चिंता करण्याची गरज नाही’

‘सध्याच्या परिस्थितीत संकुचित राजकारण केल्यास त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. काहीजणांना आपण स्वबळावर लढू आणि सरकारला अडचणीत आणू असं वाटत असेल तर ते होणार नाही. आता लोकांसमोर स्वबळाची भाषा करायला गेलात तर ते चपलेने मारतील. सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवत सध्या सर्वांनी कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.’

अनेकजण स्वबळाचा नारा देत आहेत पण हे फक्त निवडणुकांपुरतं असू नये – उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

‘कोरोनाच्या काळात आजही अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळावर लढणं हा शिवसेनेचाही हक्क आहे. पण हे स्वबळ फक्त निवडणुकांपूरत असू नये. हे स्वबळ स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं असावं.’

‘सत्तेसाठी शिवसेना कधीही लाचार होणार नाही. उगाचच कोणाचीतरी पालखी आम्ही वाहणार नाही, आमचा जन्म हा पालखी वाहण्यासाठी झालेला नाही. पायात फाटके जोडे असले तरीही चालतील पण आम्ही स्वाभिमानाने चालू.’

‘बंगालने खऱ्या अर्थाने स्वबळाचा अर्थ दाखवून दिला. ममता दीदींनी बंगालची ताकद दाखवून दिली. राजकारण आता वळत चाललं आहे, राजकारणाचं विकृतीकरण सुरु आहे. शिवसैनिकांवर टीका होत असतात. परंतू नुसतं हाणामारी करणं ही शिवसेनेची आणि शिवसैनिकांची ओळख नाही. 55 वर्षांची वाटचाल ही सोपी नाही, शिवसेना अजुनही पुढे जात आहे.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT