मंत्रिमंडळातल्या अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध – गिरीश महाजनांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्यात राजकारण तापलेलं असताना सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यातला आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरुच आहे. भाजप आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रीमंडळातल्या अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध आहे म्हणूनच आज अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

ADVERTISEMENT

“हे तीन पक्षांचं सरकार आहे, यांच्यात आपापसातच मतभेद आहेत. मंत्रीमंडळातल्या अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध आहे, म्हणूनच आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमचं सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण देण्यात आलं होतं. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करुन नंतरच आम्ही आरक्षण दिलं. न्यायालयातही आम्ही आरक्षण टिकवलं. परंतू आमचं सरकार गेलं आणि सध्याचं सरकार सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडू शकलं नाही. म्हणूनच मराठा समाजाचं आरक्षण रद्द करण्यात आलं.”

राज्य सरकारचे वकील बाजू मांडण्यात कमी पडले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं. याला भाजप सरकार जबाबदार नाही असं म्हणत गिरीश महाजनांनी सरकारला सुनावलं. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारची दुसऱ्या टर्ममधील दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने जळगावत भाजपतर्फे दिव्यांगजनांना जिवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात आलं. यावेळी गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते.

हे वाचलं का?

सध्या राज्यसभेचे खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे वेगळा पक्ष काढणार अशी चर्चाही रंगली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोण कमी पडलं, कोणामुळे आरक्षण नाकारलं गेलं याची संपूर्ण कल्पना संभाजीराजेंना आहे. ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत. ७ तारखेला ते काय भूमिका घेतात याकडे आमचं लक्ष आहे असंही गिरीश महाजन म्हणाले.

‘महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे OBC समाजाचं राजकीय आरक्षणही संपुष्टात’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT