हे कठल्या नैतिकतेत बसतं? भाजप Karuna Sharma च्या मागे उभं राहणार – चंद्रकांत पाटील
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा प्रकरणात राज्यातलं वातावरण आता हळुहळु तापायला लागलं आहे. परळीत आल्या असता करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे महिला समर्थकांची चांगलीच बाचाबाची झाली, ज्यात करुणा शर्मांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. अॅट्रोसिटीचा एवढा दुरुपयोग कधीही पाहिला नव्हता. भाजप त्यांच्या पाठीशी आहे, न्यायालयात […]
ADVERTISEMENT
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा प्रकरणात राज्यातलं वातावरण आता हळुहळु तापायला लागलं आहे. परळीत आल्या असता करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे महिला समर्थकांची चांगलीच बाचाबाची झाली, ज्यात करुणा शर्मांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे.
ADVERTISEMENT
अॅट्रोसिटीचा एवढा दुरुपयोग कधीही पाहिला नव्हता. भाजप त्यांच्या पाठीशी आहे, न्यायालयात त्यांना साथ देणं आणि त्यांच्यासाठी आंदोलन करण्यासाठी भाजप विचार करेल अशी प्रतिक्रीया पाटील यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. “धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांसोबत आपलं नात मान्य केलं आहे. हे कुठल्या नैतिकतेत बसतं? हिंदूंमध्ये दुसरं लग्न करता येत नाही. करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवलं जातं, अॅट्रोसिटीचा गैऱफायदा घेतला जातो. मी याबाबत रामदास आठवलेंशी चर्चा करणार आहे.”
दरम्यान, करूणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करूणा शर्मांवर आहे. त्यांना या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी म्हणजेच अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी म्हणजेच 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
हे वाचलं का?
सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत . बुधवारी दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.मात्र , दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यामुळे करुणा शर्मांना किमान मंगळवारपर्यंत कोठडीत राहावे लागणार हे निश्चित झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT