विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची रणनीती समोर येईल- फडणवीस
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या त्यानंतर भाजप आपली रणनीती समोर आणेल. अजून कुठेही ऑफिशियली घोषणा झालेली नाही ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनिती सगळ्यांसमोर आणेल. पहिल्यांदा यांना तो निर्णय करून द्या. गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे एवढेच सांगतो की जोपर्यंत त्यांचा अध्यक्ष पदाचा निवड होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या त्यानंतर भाजप आपली रणनीती समोर आणेल. अजून कुठेही ऑफिशियली घोषणा झालेली नाही ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनिती सगळ्यांसमोर आणेल. पहिल्यांदा यांना तो निर्णय करून द्या. गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे एवढेच सांगतो की जोपर्यंत त्यांचा अध्यक्ष पदाचा निवड होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही ज्यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक घोषित करतील त्या वेळी आमची स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर येईल असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत जाणार का?
हे वाचलं का?
केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागणार आहे का? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, ‘अशी चर्चा नेहमीच असते परंतु आमच्या पक्षांमध्ये आमचे नेते माननीय मोदीजी जो आदेश करतात तो सर्वांकरता शिरोधार्य असतो.. मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पक्षाचा आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्याला कळतं त्याला लक्षात येईल की मी महाराष्ट्रात न बाहेर जाण्याची कुठलीही शक्यता नाही ..खरं म्हणजे जे शुभचिंतक आहेत त्यांना असं वाटतं की मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होत आहे त्यामुळे त्यांनी सांगतो की माझी जाण्याची शक्यता नाही आणि काही लोकांना वाटत की गेला तर बला टळेल, पण ती टळणार नाही हे लक्षात असू द्या
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विचार याचिकेवरही मत व्यक्त केलं. याचिका केली त्यावेळेस मी सांगितलं होतं की पुनर्विचार याचिका ला फार कमीच स्कोप असतो.. सरकारने वेळ काढू पणा करू नये असंही त्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
कोण कोण सरकार वाचवत आहे? याची मला कल्पना नाही. हे सरकार अडचणीत आलं आहे असं त्यांना वाटतं आहे का? वाटत असेल तर ते अशा बैठका रोज घेत राहतात असं म्हणत फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही सरकार बनवतो आम्ही सरकार चालवतो असंही फडणवीस यांनी सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
नाना पटोलेंबाबत काय म्हणाले फडणवीस?
खरं म्हणजे नाना पटोले यांना ऊर्जामंत्रीपद हवं आहे आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे पत्र लिहितात ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी पत्र लिहून शंका व्यक्त केली आणि पुरावे दिल्यास त्याची चौकशी झालीच पाहिजे. त्यामुळे निश्चितच आमचेही मत हे आहे की जर नाना पटोले म्हणत असतील भ्रष्टाचार आहेत. त्यांच्या स्वतःचे खाते म्हणजे त्यांच्या पक्षाचं खातं आणि प्रदेशाध्यक्ष आपल्या मंत्र्याच्या खात्याच्या अशाप्रकारे भ्रष्टाचार झाला अशी मागणी करत असेल तर त्याची चौकशी तर सरकारने केली पाहिजे. बाकी असं पत्र लिहिण्यामागची नाना पटोलेंची भावना काय ते स्पष्ट दिसतं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गोपीचंद पडळकर यांच्यावर जो हल्ला झाला याचाच अर्थ हा दिसतो आहे की त्यांनी जे काम केलं त्यामुळे काही लोक डिस्टर्ब झाले. त्या नैराश्यातून हा हल्ला केला गेला आहे. ज्याचं समर्थन होऊ शकत नाही. एखादी भूमिका पटली नसेल तर त्याला उत्तर दिलं गेलं पाहिजे. चर्चा केली गेली पाहिजे अशा प्रकारे हल्ला करणं योग्य नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT