अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. आपला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर अक्षय कुमार लगेच घरात क्वारंटाइन झाला असून तो आवश्यक ते वैद्यकीय उपचार घेतोय. यावेळी अक्षयने आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःची चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. तो त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “मी सर्वांना सांगू इच्छितो की माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन असूनड डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेत असून प्रोटोकॉलही फॉलो करतोय. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची चाचणी करून घ्यावी.”

अक्षय कुमारच्या रामसेतू या सिनेमाचं शूटींग गेल्या काही दिवसांपासून सुरु होतं. अक्षयला आता कोरोनाची लागण झाल्यामुळे या सिनेमाचं शुटिंग काही दिवसांसाठी थांबण्याची शक्यता आहे. रामसेतू सिनेमात अक्षयसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडीस या अभिनेत्री काम करत आहेत. अक्षय कुमारचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर आता या अभिनेत्रींनाही स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार आहे.

हे वाचलं का?

सध्या बॉलिवूडवर कोरोनाचं सावट असून अनेक कलाकारांना कोरोनोची लागण झाल्याचं समोर आलंय. नुकतंच सिंगर आदित्या नारायण याचा देखील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आदित्यसोबत त्याची पत्नी श्वेता अगरवाल हिला देखील कोरोना झाला आहे. हे दोघंही होम क्वारंटाइन असूनसर्व नियमांचं पालन करत असल्याचं आदित्यने सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT