कोकण रेल्वे मार्गावर उक्षीदरम्यान बोल्डर कोसळला, राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनाचे चाक घसरले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोकण रेल्वे च्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेस च्या इंजिन चे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वहातूक थांबली आहे.ही घटना आज सकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ट्रेन धावत होती.

ADVERTISEMENT

या घटने नंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटना स्थळी तातडीने रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.

या घटने मध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

वैभववाडीस्टेशन वर पनवेल च्या दिशेने जाणारी मंगला एक्सप्रेस ही गाडी पहाटेपासून उभी आहे तसेच मुंबईईहुन सिंधुदुर्गात येणाऱ्या..

ADVERTISEMENT

01111- स्पेशल कोकणकण्या एक्स्प्रेस – चिपळूणमध्ये थांबली आहे 4 तास उशिरा आहे

ADVERTISEMENT

01003- स्पेशल तुतारी एक्स्प्रेस खेडमध्ये थांबली आहे 4 तास उशिरा आहे

01133 – स्पेशल मेंगलोर एक्स्प्रेस संगमेश्वर येथे थांबली आहे 4 तास उशिरा आहे

मुंबईच्या दिशेने जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस – सावंतवाडी स्टेशनला पुढील सिग्नल मिळत नसल्याने सावंतवाडी स्टेशनवर थांबवली आहे

व मार्गावर धावणाऱ्या इतरही विविध गाड्या सध्या नजीकच्या स्टेशन वर थांबवण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT