लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ-बहिणीला चाकूचा धाक दाखवून लुटलं, आरोपी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ-बहिणीला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी भावा-बहिणीकडे असलेला मोबाईल, बॅग चोरून पळ काढणार इतक्यातच चार चोरट्यांपैकी एकाला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

ADVERTISEMENT

इतर तीन आरोपी फरार झाले असून हे छोटा पापा टोळीचे सदस्य असल्याचं कळतंय. छोटा पापा टोळीविरुद्ध इगतपुरी भागात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. संजू उर्फ सोनू मस्तान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजल्याच्या दरम्यान पीडित भाऊ बहीण आंबिवली रेल्वे स्थानकाहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. आंबिवलीहून लोकल सुरू होताच लोकलमध्ये गर्दी नसल्याची संधी साधत चार तरुण त्यांच्याजवळ आले. यामधील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत या दोघांजवळील बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतले. इतक्यात शहाड रेल्वे स्टेशन आले आणि या चारही तरुणांनी ट्रेनमधून उतरून पळ काढला. दोघा भाऊ बहिणीने आरडाओरड केल्याने स्टेशनवरील प्रवाशांनी सतर्कता दाखवली आणि पळून जाणाऱ्या एका चोरट्याला पकडलं, मात्र त्याचे तिघे साथीदार निसटण्यात यशस्वी ठरले.

हे वाचलं का?

अरेरे! रडणाऱ्या चिमुकलीची बापाने नाक-तोंड दाबून केली हत्या; भाईंदरमधील हृदयद्रावक घटना

कल्याण पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. परंतू या घटनेमुळे रात्रीच्या सुमारास लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ADVERTISEMENT

Crime: विहिरीत ढकलून जावयाने केली सासूची हत्या

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT