बुलढाणा : दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या ८ आरोपींना अटक
बुलढाणा पोलिसांनी शेगाव-वरवट रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या ८ जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी केल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांचं पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना हे आरोपी हातात लागले. आरोपींकडून पोलिसांनी वाटमारीमध्ये वापरण्यात येणारं हत्यार आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. हे आरोपी बुलढाणा, जळगाव […]
ADVERTISEMENT
बुलढाणा पोलिसांनी शेगाव-वरवट रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या ८ जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी केल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांचं पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना हे आरोपी हातात लागले.
ADVERTISEMENT
आरोपींकडून पोलिसांनी वाटमारीमध्ये वापरण्यात येणारं हत्यार आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. हे आरोपी बुलढाणा, जळगाव जिल्ह्यातले असल्याचं कळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरापासून ३ कि.मी अंतरावर वरवट रोड वरील गॅस गोडाऊन जवळ शनिवारी रात्री अंधारामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार लाईट बंद करून उभी होती. त्याच वाहनाच्या बाजूला एक दुचाकीही उभी होती. या दोन्ही वाहनातील इसम हळू बोलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सदर वाहनांची स्थिती बघता पोलिसांना संशय आला. यावेळी पोलीस येत असल्याचं पाहताच दुचाकी चालक हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांना घेराव टाकून त्याला पोलिसांनी जागीच पकडलं.
हे वाचलं का?
त्याठिकाणी कारमध्ये असलेल्या इसमांची पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ज्यामुळे पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता कार मध्ये लालसर रंगाची मिरचीपूड असलेली पॉलिथीन पिशवी दोन पांढऱ्या रंगाची अंदाजे दहा फूट लांबीची सूती दोरी, तांब्याच्या धातुच्या डब्यात सोनेरी रंगाचे धातूचे गोल ५० शिक्के, दोन लाकडी दांडे, एक लोखंडी तलवार, एक लोखंडी चाकू, बारा मोबाईल आणि एक लोखंडी धातूचा सुरा तसेच एक काचेची बंद नळी असे गुन्ह्यात वापरल्या जाणारे साहित्य मिळून आलं. पोलिसांनी या प्रकरणात आठही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ७ लाख १० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT