पंढरपूर : JCB मधून मिरवणूक, ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. ज्यात संचारबंदीपासून सर्व प्रकारच्या राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतू काही भागांमध्ये सरकारच्या नियमांना सर्रास धाब्यावर बसवण्याचे प्रकार सुरु आहेत. पंढरपूरच्या ओझेवाडी येथील पंचायत समितीच्या उपसभापतीची निवड झाल्यानंतर चक्क जेसीबीमधून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत इथे कोरोनाविषयक सर्व नियमांचं उल्लंघन होताना दिसत होतं.

ADVERTISEMENT

पंचायत समितीच्या उप-सभापती पदावर राजश्री भोसले यांची निवड झाली. यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये त्यांना उभं करुन मिरवणूक काढल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या अनुषंगाने पंढरपूर पोलिसांनी ७६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अवश्य वाचा – औरंगाबाद : दहावी–बारावी वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद

हे वाचलं का?

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी यात्रा, राजकीय सभा-कार्यक्रम, उत्सव यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतू काही भागांमध्ये आजही नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी वेळापूर येथील पोलीसाने डीजे लावून आपला वाढदिवस साजरा केला होता, ज्यानंतर २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

अवश्य वाचा – नागपूर : रुग्णवाढीचा आलेख चढताच, १ हजाराहुन अधिकांना कोरोनाची लागण

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT