नागपूर : रुग्णवाढीचा आलेख चढताच, १ हजाराहुन अधिकांना कोरोनाची लागण
विदर्भातील अमरावती आणि अकोला या दोन शहरांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर विदर्भातील उर्वरित महत्वाच्या शहरांमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्यात चिंताजनक वाढ होते आहे. नागपुरात गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ७० लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ हजाराच्या पार गेल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. नागपुरात […]
ADVERTISEMENT

विदर्भातील अमरावती आणि अकोला या दोन शहरांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर विदर्भातील उर्वरित महत्वाच्या शहरांमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्यात चिंताजनक वाढ होते आहे. नागपुरात गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ७० लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ हजाराच्या पार गेल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
नागपुरात गुरुवारी ८ जणांना कोरोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले. वाढती रुग्णसंख्या पाहता नागपूर जिल्हा परिषदेने १२ मार्चपर्यंत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केला आहे. जिल्हा परिषदेच्या १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.
अवश्य वाचा – औरंगाबाद : दहावी–बारावी वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद
दरम्यान गुरुवारी नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित आठ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत. हे ८ मृत्यू ठाणे-५, अहमदनगर १, जालना १ आणि यवतमाळ १ असे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.