मुंबईची खबर: पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकावर मोठं अपग्रेड! तीन नव्या मार्गिकांमुळे ट्रेनच्या फेऱ्या वाढणार...
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसमध्ये मोठे अपग्रेड करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या स्थानकावर तीन नवीन मार्गिकांची निर्मिती केल्यामुळे गाड्यांसाठी अतिरिक्त पार्किंग जागा उपलब्ध झाली असून यामुळे अधिक गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकावर मोठं अपग्रेड!
तीन नव्या मार्गिकांमुळे ट्रेनच्या फेऱ्या वाढणार...
Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसमध्ये मोठे अपग्रेड करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची देखभाल क्षमता वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या स्थानकावर तीन नवीन मार्गिकांची निर्मिती केल्यामुळे गाड्यांसाठी अतिरिक्त पार्किंग जागा उपलब्ध झाली असून यामुळे अधिक गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
नव्या टर्मिनसचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात
रेल्वे टर्मिनसवर क्षमता वाढवण्यासाठी मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर नवे ट्रॅक बनवले जात आहेत. यासोबतच, सध्याच्या ट्रॅकवर प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचं काम देखील सुरू आहे. तसेच, जोगेश्वरी, वसई रोडवर नव्या टर्मिनसचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. वांद्रे स्थानकावर तीन मेंटेनन्स ट्रॅक होते आणि प्रवासी गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता तीन नवे ट्रॅक बांधण्यात आले असून यामध्ये ट्रेन वॉशिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.
हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय थेट भारत सरकारच्या कंपनीत नोकरी... कधीपर्यंत कराल अर्ज?
प्रोजेक्टसाठी एकूण 53 कोटी रुपये खर्च
चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर विनीत अभिषेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लाइन्सवर एलएलबी (लिंके हॉफमन बुश) आणि आयसीएफ (इंटिग्रल कोच फैक्ट्री) सह सर्व प्रकारच्या डब्यांची देखभाल केली जाऊ शकते. वांद्रे टर्मिनस कोचिंग डेपोमध्ये दररोज सुमारे 800 कोचची देखभाल केली जाते. तसेच, एलएचबी कोचची दर 36 महिन्यांनी आणि आयसीएफ कोचची दर 18 महिन्यांनी देखभाल केली जाते. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी एकूण 53 कोटी रुपये खर्च झाले असून मागील काही वर्षांपासून याचं काम सुरू आहे. नवीन मार्गांपैकी पहिली मार्गिका जुलै 2024 मध्ये कार्यान्वित झाली. उर्वरित दोन मार्गिकांचे काम डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पावर एकूण 53 कोटी 76 लाख रुपये रुपये खर्च झाले.
हे ही वाचा: '20 जूनला पळालात... त्याच्या महिनाभर आधीच...', महाचावडीवर आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंबाबत मोठा खुलासा
हँडहेल्ड एक्स-रे मशीन्स
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. राज्यात राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि रुग्णकेंद्रित सेवा प्रदान करणे यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. केंद्राने राज्यात क्षयरोग रुग्णांचे एक्स-रे स्क्रीनिंग वाढवण्याचा सल्ला दिला आणि केंद्र लवकरच राज्याला आणखी 96 हँडहेल्ड चालणाऱ्या एक्स-रे मशीन पुरवणार असल्याचं आबिटकर बैठकीनंतर म्हणाले.










