Narayan Rane: ‘थांब रे, मध्ये बोलू नको’, पाहा नारायण राणे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांना असं का म्हणाले!

मुंबई तक

चिपळूण: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकताच रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) येथे झालेल्या भूस्खलन आणि पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे देखील त्यांच्यासोबत होते. याच दौऱ्यादरम्यान, नारायण राणेंचा एक व्हीडिओ सध्या खूपच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

चिपळूण: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकताच रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) येथे झालेल्या भूस्खलन आणि पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे देखील त्यांच्यासोबत होते.

याच दौऱ्यादरम्यान, नारायण राणेंचा एक व्हीडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राणेंनी थेट दरेकरांनाच असं म्हटलं की, ‘थांब रे, मध्ये बोलू नको’… हा संपूर्ण प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घडला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असणाऱ्या प्रविण दरेकर यांना थेट सर्वांसमोर गप्प राहा असं नारायण राणे यांनी म्हटल्याने आता याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

मुसळधार पावसाने कोकण किनारपट्टीला चांगलंच झोडपून काढल्याने कोकणातील अनेक भागात विशेषत: चिपळूणमध्ये महापूर (Chiplun Floods) आला होता. ज्यामुळे येथे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे हे कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाडमधील तळीये गावाला देखील भेट दिली होती. ज्यानंतर ते चिपळूणला रवाना झाले होते.

हे वाचलं का?