शहरातल्या ३ जंबो कोविड सेंटरचं BMC कडून स्ट्रक्चरल ऑडीट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आगामी मान्सून कालावधीचा विचार करत मुंबई महापालिकेने शहरातील ३ जंबो कोविड सेंटर्सचं स्ट्रक्चरल ऑडीट केलं आहे. आगामी २ आठवड्यांसाठी शहरातली ३ कोविड सेंटर्स बंद राहणार असून या काळात महापालिका या कोव्हिड सेंटरमध्ये ऑडिटमध्ये सुचवलेले बदल करणार आहे.

ADVERTISEMENT

Door to Door Vaccination : हे सर्व पब्लिसिटीसाठी सुरु होतं का? BMC च्या पवित्र्यावर हायकोर्ट संतापलं

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुलुंड आणि दहीसर ही तीन कोविड दोन आठवड्यांसाठी बंद राहणार आहेत. “कोरोना महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली होती. ३-६ महिन्याच्या कालावधीसाठी या कोविड सेंटरचा वापर होईल या पद्धतीने ही सेंटर्स उभारण्यात आली होती. पण गेल्या वर्षभरापासून आम्ही या कोविड सेंटर्सचा वापर करत आहोत, म्हणून या तिन्ही सेंटर्सचं ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबई तकशी बोलताना माहिती दिली. याव्यतिरिक्त इतर कोव्हिड सेंटरचंही ऑडिट होणार आहे. मात्र, इतर जंबो कोव्हिड सेंटरमध्ये रुग्ण उपचार घेत असल्याने त्यांचं ऑडिट बाहेरुनच करण्यात येईल.

हे वाचलं का?

पुढील दोन आठवड्यांच्या कालावधीत तिन्ही कोविड सेंटर्समध्ये रिपेअरिंग आणि इतर महत्वाची काम केली जातील. मान्सून काळात मुंबईतल्या या कोविड सेंटर्सला कसलाही धोका पोहचणार नाही या दृष्टीने तिन्ही सेंटर्समध्ये काम केलं जाईल अशी माहिती काकाणी यांनी दिली. मान्सून काळातही ही सेंटर्स कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहेत.

ADVERTISEMENT

महापालिकेच्या या तिन्ही कोविड सेंटर्समध्ये लसीकरणाचं कामही केलं जातं. परंतू स्ट्रक्चरल ऑडीटच्या काळात लसीकरणाचं काम सुरु राहणार असल्याची माहिती BKC कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी दिली. दरम्यान कोविड सेंटर्स दोन आठवडे बंद राहणार असल्यामुळे इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीबद्दलची शाश्वता नाहीये. दोन आठवड्यानंतर काय करायचं याबद्दल अद्याप पुरेशी माहिती मिळाली नसल्याचं काही कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT