Maharashtra Corona: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज रविवार 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता सोशल मीडियावरून (Social Media live) राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

राज्यात सध्या कोरोनाचा (Corona)) संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील जवळजवळ 25 जिल्ह्यात लॉकडाऊनसंबंधी (Lockdown) जे कठोर नियम होते ते आधीच शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरीही अद्याप संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही. राज्यात जवळजवळ 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 निर्बंध आहेत. अशावेळी या सगळ्याबाबत मुख्यमंत्री आजच्या संबोधनात काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार?

हे वाचलं का?

दुसरीकडे मुंबईतील लोकल ट्रेन अद्यापही सुरु करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईतील नोकरदार वर्गाला खूपच जास्त फटका बसत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यात याव्यात अशी मागणी सातत्याने सुरु आहे. मात्र, अद्याप तरी मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतलेला नाही.

याबाबत राज्यातील विरोधी पक्ष भाजप, मनसे यांनी मुंबई लोक ट्रेन सुरु करण्यात यावी यासाठी सातत्याने मागणी केली आहे. तसंच आता अनेक रेल्वे संघटना देखील अशाच स्वरुपाची मागणी करत आहे. अनेकांची अशी मागणी आहे की, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किमान त्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी. दरम्यान, या सगळ्या मागण्यांचा मुख्यमंत्री कशा पद्धतीने विचार करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

व्यापारी वर्गाला दिलासा मिळणार?

ADVERTISEMENT

राज्यातील 11 जिल्ह्यात अद्यापही निर्बंध कायम आहेत. कारण येथील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. ज्यामुळे येथील भागातील दुकानं फार कमी वेळ सुरु ठेवता येत आहे. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाची मागणी आहे की, लवकरात लवकर येथील दुकानं सुरु ठेवण्याची वेळ वाढविण्यात यावी.

अशावेळी व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा काही मुख्यमंत्री निर्णय घेणार का? याकडेही अनेकांचं लक्ष असणार आहे.

Good News : Johnson and Johnson च्या सिंगल डोस कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापराची संमती

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. अशावेळी निर्बंध शिथिल करुन राज्यातील जनतेला दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री आपल्या संबोधनात बोलू शकतात.

पण असं असलं तरीही तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा आधीच देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करुन देखील मुख्यमंत्री सर्व निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT