अमरावती : काश्मीर फाईल्स चित्रपट पाहून परतताना दोन गटांमध्ये राडा, १५ जणांना अटक
The Kashmir Files हा सिनेमा सध्या देशभरात चांगलाच चर्चेत आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामुळे सध्या शहरात तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजल्याच्या दरम्यान परतवाडा भागातील लाल पूल भागात ही घटना घडली आहे. चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर जय श्रीरामचे नारे लगावण्यात आले. […]
ADVERTISEMENT
The Kashmir Files हा सिनेमा सध्या देशभरात चांगलाच चर्चेत आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामुळे सध्या शहरात तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजल्याच्या दरम्यान परतवाडा भागातील लाल पूल भागात ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर जय श्रीरामचे नारे लगावण्यात आले. ज्यानंतर दोन गटांमध्ये नारेबाजी सुरु होऊन त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून १५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही युवकांनी लाल पूलनजीक आझादनगर भागात ‘जय श्रीराम’ची नारेबाजी केली. त्यांच्या घोषणा ऐकून आझादनगर येथील काही मुस्लिम युवकसुद्धा बाहेर आले. दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. या गदारोळात एका इसमाला मारहाण करण्यात आली. यावेळी तिकडे उपस्थित असलेल्या पोलीस पथकाने या जमावाला पांगवले.
निकष काय आहेत?; ‘द कश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यावरून ‘झुंड’च्या निर्मात्याच्या सवाल
हे वाचलं का?
पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटातील १५ जणांना सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना अचलपूर न्यायालयात हजर केलं असताना त्यांना जामीनावर सोडण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेची माहिती कळताच अमरावतीचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ हे अचलपूरमध्ये ठाण मांडून बसले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून परतवाडा भागात पोलिसांनी अतिरीक्त कुमक तैनात केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT