लेटरबॉम्बच्या वादात काँग्रेसची उडी, कोअर कमिटी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर झालेले गंभीर आरोप आणि NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंचं शिवसेना कनेक्शन यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधले दोन पक्ष बॅकफूटला गेलेत. अशा परिस्थितीत सरकारमधील तिसरा घटक असलेल्या काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. काँग्रेसची कोअर कमिटी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

ADVERTISEMENT

भाजपच्या ‘त्या’ आरोपांचं अनिल देशमुखांनी दिलं उत्तर, म्हणाले…

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी आज परिपत्रक जाहीर करत काँग्रेसची बाजू मांडली आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हा आणि इतर काँग्रेसचे नेते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अनिल देशमुखांनी या विषयात आपली बाजू मांडत, मुख्यमंत्र्यांना निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारही या विषयावर बोलले असून या प्रकरणात देशमुखांचा राजीनामा घेतला जाईल हा देखील एक पर्याय असल्याचं ते म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

मोठी बातमी: …आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवारांकडून क्लीन चीट

परंतू महाविकास आघाडी सरकारचा एक महत्वाचा घटक असल्याच्या कारणामुळे आज काँग्रेसची कोअर कमिटी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असेल असंही पाटील यांनी परिपत्रकात म्हटलं आहे. सचिन वाझे यांच्या अटकेपासून परमबीर सिंग यांच्या पत्रापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत काँग्रेसचे नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

अँटेलिया प्रकरणाचे हादरे गृहमंत्र्यांपर्यंत, कसे अडकत गेले अनिल देशमुख?; पाहा सविस्तर रिपोर्ट

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT