योगी-महाराज राजकारणात येतात, तेव्हा देशाचं वाटोळं सुरू होतं; प्रणिती शिंदेंची योगींवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. ज्या दिवशी योगी आणि महाराज राजकारणात येतात, त्या दिवशी देशाचं वाटोळ सुरू होतं, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. सोलापुरातील हेरिटेज हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी योगी आदित्यनाथांसह मोदी सरकारवर निशाणा साधला.

UP election results : भाजपने उत्तर प्रदेशात कसा घडवला इतिहास? ही आहेत १० कारणं…

हे वाचलं का?

“उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यावर शेतकऱ्यांबद्दलचे तीन काळे कायदे रद्द केले. सातशे शेतकऱ्यांचे बळी तुम्ही घेतले आणि नंतर कायदे रद्द केले. देशाला तोडण्याच्या घोषणा हे लोक करत आहेत. योगी महाराजांबद्दल आम्हाला मान आहे, पण त्यांचं स्थान मंदिर आणि मठात आहे. राजकारणात नाही,” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

“ज्या दिवशी राजकारणात योगी आणि महाराज येतात, त्या दिवशी देशाचं वाटोळ सुरू होतं. जे काम करतात, त्यांना मतदान करणं महत्त्वाचं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कामाला महत्त्व द्या”, असं त्या म्हणाल्या.

ADVERTISEMENT

साहेबांना हे चांगलंच माहित आहे, त्यात फसू नका! भाजप विजयावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रीया

ADVERTISEMENT

योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पुन्हा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ३७ वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवून मुख्यमंत्री होण्याचा इतिहास योगींनी घडवला असून, सध्या शपथविधी सोहळ्याची तयारी उत्तर प्रदेशात सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT