राऊतांना मोठा दिलासा, ‘त्या’ याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. यावेळी कोर्टने टीका करायची त्यांना टीका करु द्या’ असं स्पष्ट सांगितलं. विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना झुकतं माप देत असल्याचा आरोप केल्यावरुन दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टाने तातडीच्या सुनावणीला नकार दिला संजय राऊत यांनी कोर्टाबाबत काय म्हटलं होतं? सेव्ह […]
ADVERTISEMENT
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. यावेळी कोर्टने टीका करायची त्यांना टीका करु द्या’ असं स्पष्ट सांगितलं. विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना झुकतं माप देत असल्याचा आरोप केल्यावरुन दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टाने तातडीच्या सुनावणीला नकार दिला
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी कोर्टाबाबत काय म्हटलं होतं?
सेव्ह विक्रांत कथित घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्या यांना कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली होती. ‘एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून संरक्षण आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे.’ असा आरोप राऊत यांनी केला होता.
हे वाचलं का?
‘महाविकास आघाडीतील नेत्यांना असे दिलासे का मिळत नाहीत? न्यायव्यवस्थेत एका पक्षाच्या विचारांची लोक आहेत म्हणून हे सुरू आहे.’ असं वक्तव्य माध्यमांसमोर केलं होतं.
तर, शिवाय शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातूनही यावर भाष्य केलं होतं. ‘फसवणाऱ्यांना दिलासा, मायलॉर्ड हे काय?; या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातूनही अशीच टीका करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
याविरोधात इंडियन बार असोसिएशनने अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे तिघेही प्रतिवादी होते.
ADVERTISEMENT
याच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. हा न्यायालयाचा कामाचा शेवटचा आठवडा आहे. त्यानंतर न्यायालयाला सुट्टी असणार आहे. त्यामुळे तातडीने सुनावणीची गरज नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं.
संजय राऊत सोमय्यांना म्हणाले XX; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला
‘ज्यांना टीका करायची त्याला करू दे. जोपर्यंत आमचे खांदे भक्कम आहेत आणि जोपर्यंत आमचा विवेक शुद्ध आहेत तोपर्यंत अशा विषयांकडे लक्ष देण्याची किंवा त्यांची दखल घेण्याची गरज नाही.’ असं स्षष्ट शब्दात न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी सांगितलं आणि याचिकेच्या तातडीच्या सुनावणीला नकार दिला. त्यानंतर वकीलांनी पुन्हा विनंती केल्यानंतर या याचिकेवर नंतर विचार करू असं कोर्ट म्हणालं.
त्यामुळे आता या याचिकेबाबत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, या याचिकेबाबत संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT