देशात 18 जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत Corona रूग्ण, महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांचा समावेश-केंद्रीय आरोग्य मंत्रालय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. दुसऱ्या लाटेनंतर या रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे सांगितलं आहे की देशभरात असे 18 जिल्हे आहेत जिथे कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. यापैकी 10 जिल्हे एकट्या केरळमधले आहेत. तर महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांचा या 18 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी सांगितलं की देशातल्या 57 जिल्ह्यांमध्ये रोज 100 रूग्ण आढळत आहेत. तर देशातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे की, केरळमधले 10 जिल्हे, महाराष्ट्रातील 3, मणिपूरमधले 2, अरूणाचल, मेघालय आणि मिझोरमच्या प्रत्येकी एक-एक जिल्ह्यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

दुसरी लाट अद्याप संपलेली नाही असंही वक्तव्य लव अग्रवाल यांनी केलं आहे. भारताच्या बाबतीत विचाराल तर दुसरी लाट अद्याप संपेली नाही. देशात आत्तापर्यंत 45 कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 37 कोटींहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर 10.59 कोटी जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

27 जुलैला काय म्हटलं आरोग्य मंत्रालयाने?

हे वाचलं का?

27 जुलैला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोलापूर आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा हाय पॉझिटिव्हिटी रेट आहे अशी माहिती दिली होती. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रूग्ण कमी होताना दिसत आहेत. आजपासूनच महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर दुसरी लाट संपली नसल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT