नागपूर: प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या; सावनेर भागातली घटना, परिसरात खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका प्रेमी युगुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. सावनेरच्या माताखेडी परिसरात हे प्रेमी युगुल राहत होतं. प्रियकर आकाश लालबागेने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचं कळताच त्याची प्रेयसी किरण काकडेनेही आपल्या घरी आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या कामठी भागात अल्पवयीन जोडप्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच सावनेरमध्ये अशाच प्रकारची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

पीएचडीच्या विद्यार्थिनींचा मानसिक छळ; अपमानास्पद वागणूक, पैशांची मागणी केल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरण आणि लग्नाला घरातून असणारा विरोध या कारणामुळे या जोडप्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. सावनेर पोलीस या घटनेचा अधिक तपास करुन असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे,

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT