पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा, परंतू अजुनही आरोपी मोकाटच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– मिथीलेश गुप्ता, कल्याण प्रतिनिधी

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक प्रसंग समोर आला आहे. विवाहीत महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतू यात अटकेची कारवाई न केल्यामुळे सासरची मंडळी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबियांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. कल्याणजवळच्या उंबर्डे गावात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उंबर्डे गावात बिपीन कारभारी याचं दोन वर्षांपूर्वी अंबरनाथ येथे राहणाऱ्या आश्विनी भोईर हिच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर एका वर्षाच्या कालावधीतच दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. पती बिपीन याच्यासह आश्विनीची सासू, नणंद, दीर, नणंदेचा नवरा ही आश्विनीला शारिरिक आणा मानसिक त्रास द्यायला लागली. या त्रासाला कंटाळून आश्विनीने उंबर्डे गावात आपल्या सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आश्विनीच्या आत्महत्येमुळे तिच्या दोन वर्षांच्या मुलीवर आभाळ फाटलं आहे. या घटनेनंतर आश्विनीच्या घरच्यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंद केला. परंतू गुन्हा दाखल झाल्यानंतरही या आरोपींना अटक करण्यात खडकपाडा पोलिसांना अपयश आलंय. इतका कालावधी जाऊनही पोलिसांना आरोपी कसे सापडत नाहीत असा प्रश्न आश्विनीचा भाऊ सुमीत भोईरने विचारला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT