Karachi विमानतळ दाऊदचा, D गँगला खुलेआम प्रवेश, वाचा झोप उडवणारी कहाणी
Dawood control Karachi airport NIA: मुंबई: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) पाकिस्तानशी (Pakistan) असलेले संबंध कोणापासूनही लपून राहिलेले नाहीत. आता दाऊद इब्राहिमबाबत असे काही खुलासे झाले आहेत, ज्यावरून त्याचा पाकिस्तानमधील प्रभाव दिसून येतोय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमधील कराची (Karachi) हे आंतरराष्ट्रीय विमानतळही (Airport) ताब्यात घेतले आहे. दाऊदचे नातेवाईकही विमानतळावर कोणतीही चौकशीविना प्रवेश […]
ADVERTISEMENT
Dawood control Karachi airport NIA: मुंबई: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) पाकिस्तानशी (Pakistan) असलेले संबंध कोणापासूनही लपून राहिलेले नाहीत. आता दाऊद इब्राहिमबाबत असे काही खुलासे झाले आहेत, ज्यावरून त्याचा पाकिस्तानमधील प्रभाव दिसून येतोय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमधील कराची (Karachi) हे आंतरराष्ट्रीय विमानतळही (Airport) ताब्यात घेतले आहे. दाऊदचे नातेवाईकही विमानतळावर कोणतीही चौकशीविना प्रवेश करतात आणि बाहेर पडतात. एवढेच नाही तर त्यांना दुबईपर्यंत (Dubai) प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन क्लिअरन्स किंवा कोणत्याही स्टॅम्पची गरज पडत नाही. एनआयएच्या (NIA) चौकशीत हा खुलासा झाला आहे. (dawoods dominance at pakistan karachi airport no immigration clearance no stamp required direct entry of relatives)
ADVERTISEMENT
वास्तविक, टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याला अटक केली होती. यानंतर एनआयएने सलीम फ्रूट याच्या पत्नीचा जबाब नोंदवला होता. सलीम फ्रुट यांच्या पत्नीच्या जबाबानुसार पाकिस्तानातील विमानतळ अंडरवर्ल्डच्या ताब्यात आहेत. दाऊदचे नातेवाईक किंवा मित्र जेव्हा पाकिस्तानात येतात तेव्हा त्यांची नोंदही विमानतळावर होत नाही. म्हणजेच दाऊदच्या ओळखीच्या लोकांना चेक इन आणि चेक आउट न करता पाकिस्तानात सहज प्रवेश मिळतो.
टेरर फंडिंगच्या तपासात गुंतलेल्या एनआयएला चौकशीदरम्यान कळले आहे की, कराची विमानतळ डी-कंपनीच्या ताब्यात आहे. परिस्थिती अशी आहे की, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह त्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा डी कंपनीसोबत व्यावसायिक व्यवहार करणाऱ्यांसाठी आलेल्या लोकांच्या पासपोर्टवर शिक्काही मारला जात नाही.
हे वाचलं का?
NIAची मुंबईत मोठी कारवाई! दाऊद इब्राहीमचा राईट हॅण्ड छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक
कराची विमानतळावर डी कंपनीचे वर्चस्व
कराची विमानतळावरील व्हीआयपी लाउंजमधून लोकांना थेट दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या घरी नेले जाते. कराची विमानतळावर डी कंपनीचा दबदबा यावरून लावता येतो की भेटायला आलेले लोक परत जातात तेव्हा पाकिस्तानच्या कनेक्टिंग फ्लाइटमध्येही इमिग्रेशन क्लिअरन्सशिवाय त्यांना थेट दुबई किंवा आखाती देशांमध्ये पाठवले जाते. अशाप्रकारे, दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलला कोणी भेटले याचा कोणालाही सुगावा देखील लागत नाही.
ADVERTISEMENT
सलीम फ्रूटची पत्नी ३ वेळा बेकायदेशीरपणे गेलेली पाकिस्तानात
एनआयएच्या चौकशीदरम्यान सलीम फ्रूटच्या पत्नीने सांगितलं की, छोटा शकीलची पत्नी नजमा ही तिची बहीण आहे. तर छोटा शकीलची मुलगी झोया ही तिची भाची असल्याचे सांगितले. सलीम फ्रूटच्या पत्नीने सांगितले की, ती तीन वेळा बेकायदेशीरपणे पाकिस्तानातील कराचीत गेली होती. सलीम फ्रूटही दोन वेळा पाकिस्तानात गेला होता. एकदा तो छोटा शकीलला भेटायला आणि दुसऱ्यांदा छोटा शकीलची मुलगी झोया आणि अनमच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी पाकिस्तानला गेला होता.
ADVERTISEMENT
एनआयएला दिलेल्या जबाबात सलीम फ्रूटची पत्नी साजियाने सांगितले की, 2013 मध्ये छोटा शकीलची मुलगी झोयाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ती आपल्या मुला आणि मुलीसोबत कराचीला गेली होती. सलीम फ्रूटचे कुटुंब दुबई ते पाकिस्तानच्या कनेक्टिंग फ्लाइटने कराची विमानतळावर पोहोचले होते जिथे त्यांच्या पासपोर्टची कोणतीही तपासणी न करता आणि शिक्का न मारता प्रवेश देण्यात आला होता.
Dawood: मोठी बातमी… दाऊदने केलं दुसरं लग्न, पाकमधला पत्ताही समजला!
छोटा शकीलचा एक माणूस विमानतळावर त्यांना घेण्यासाठी आला होता आणि त्यानेच त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर तो त्यांना थेट छोटा शकीलच्या घरी घेऊन गेला होता. दरम्यान, शकिलची मोठी मुलगी झोया हिच्या लग्नात सलीम फ्रूट हजर नव्हता.
24 मार्च 2014 रोजी छोटा शकीलची धाकटी मुलगी अनम हिचेही लग्न झाले होते. यात सामील होण्यासाठी सलीम फ्रूटची पत्नी आपल्या मुलांसह पाकिस्तानी विमान कंपनीने कराची विमानतळावर पोहोचली होती. जिथे कराची विमानतळावर उतरल्यानंतर तिला शिक्क्याशिवाय थेट छोटा शकीलच्या घरी नेण्यात आले होते. जिथे हे लोक जवळपास 5 ते 6 दिवस थांबले होते. त्यानंतर ते दुबईमार्गे भारतात परतले होते.
त्यानंतर 18 सप्टेंबर 2014 रोजी छोटा शकीलची मुलगी झोया हिच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सलीम फ्रूटने त्याच दिवशी मुंबई ते कराची आणि कराची ते रियाध तिकीट बुक केले होते. सलीम फ्रूट आणि त्यांची पत्नी, मुले पुन्हा एकदा विमानाने कराचीला पोहोचले. कराचीमध्ये त्यांना स्टॅम्प-फ्री एंट्री मिळाली आणि छोटा शकीलच्या मुलीच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर, 19 सप्टेंबर 2014 रोजी सकाळी सलीम फ्रूट फ्लाइटने थेट रियाधला पोहोचला, त्या दरम्यान तो छोटा शकील आणि डी-कंपनीच्या लोकांसोबत सुमारे 17 तास सोबत होता. तर सलीम फ्रूटची पत्नी पुन्हा एकदा ५ ते ६ दिवस राहून दुबईला गेली आणि तेथून भारतात परतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT