सलमान खानचा ‘राधे’ सिनेमा बॉयकॉट करण्याची सोशल मीडियावर मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा राधे हा सिनेमा चर्चेत आहे. मे महिन्यात हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. गुरुवारी या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमाच्या चर्चा रंगल्या. अशातच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी या फिल्मला बायकॉट करण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू केली.

ADVERTISEMENT

ट्विटरवर #BoycottRadhe हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. या हॅशटॅगसह सुशांतच्या चाहत्यांनी राधे सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. यावेळी एकाने, “#RadheTrailer सुरू झाल्यावर तो संपुर्ण न बघता काही सेकंदातच डिसलाईक करणारा जर कोणी असेल तर तो मी आहे.” असं ट्विट केलं आहे.

हे वाचलं का?

तसंच एका व्यक्तीने लिहलंय, “मी माझं काम केलं. मी राधे सिनेमाच्या ट्रेलरला डिसलाईक केलं. आता तुमची वेळ आहे.” सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी युट्यूबवरही सलमानच्या ‘राधे’ सिनेमाच्या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात डिसलाईक केलं आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या ‘राधे’चा ट्रेलर शेअर केला होता. चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT