Diwali 2022: दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा होतो आहे. दीपावलीनिमित्त अनेक ठिकाणी दीपोत्सवाचंही आयोजन करण्यात आलं आहे. मनसेच्या दादर येथील दीपोत्सवात […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा होतो आहे. दीपावलीनिमित्त अनेक ठिकाणी दीपोत्सवाचंही आयोजन करण्यात आलं आहे. मनसेच्या दादर येथील दीपोत्सवात राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघेही एकाच मंचावर होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे हे महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
वर्षा बंगल्यावर अनोखी दिवाळी साजरी
हे वाचलं का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबीयांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली. तसंच त्यांच्यासोबत फराळही केला. आलेल्या शेतकरी कुटुंबांचं औक्षणही यावएळी करण्यात आलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असंही आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलं.
पाडवा आणि भाऊबीज एकत्र
ADVERTISEMENT
आज (बुधवार) पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. दिवाळीतल्या पाडव्याला विशेष महत्त्व आहे कारण हा पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. या दिवशी शुभ खरेदी करण्याचीही र प्रथा आहे. तसंच सोनंही आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जातं. व्यापारी हे त्यांच्या वर्षभराच्या चोपड्या बदलतात. पारंपरीक पद्धतींनुसार चोपड्यांचं पूजनही केलं जातं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT