Maratha Morcha : मराठा समाजाची देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, अश्रूधूर सोडले गेले, ही अत्यंत दुदैवी घटना घडली. या घटनेची मी सरकारच्यावतीने माफी मागतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
जालन्याच्या अंतरावली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. या सर्व घडामोडींवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुरूवातीला जालन्याच्या अंतरावली सराटी गावात घडलेल्या घटनेची सरकारच्यावतीने माफी मागितली. (devendra fadnavis apologize maratha community jalana maratha protester antaravali sarati cm eknath shinde meeting)
ADVERTISEMENT
जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, अश्रूधूर सोडले गेले, ही अत्यंत दुदैवी घटना घडली. या घटनेची मी सरकारच्यावतीने माफी मागतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही पक्षांनी या घटनेवरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, वरून फोन आला, अशा प्रकारचे नरेटीव्ह सेट केले. हे अत्यंत दुदैवी आहे. या सगळ्यांना लाठीचार्जचे आदेश एसपी डीएसपींचे असतात, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : Ajit Pawar : “सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारमधून बाहेर पडा”, घोषणांनी बारामती दणणाली
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या आदेशाने मारले होते, त्यावेळी आदेश कुणी दिला होता? तो मंत्रालयातून आला होता का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. मावळला शेतकरी गोळीबाराने मृत्यूमुखी पडले होते, तेव्हा आदेश कुणी दिले होते. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यानी आदेश दिले होते का? इतके शेतकरी मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही ? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे 5 मे 2021 पासून एक वर्ष एक महिना मुख्यमंत्री होते, त्यावेळेसे वटहूकूम निघू शकत होता. त्यावेळस तुम्ही वटहूकूम का काढला नाही,असा सवाल फडवणीसांनी ठाकरेंना केला. तसेच जे आरक्षण आम्ही हायकोर्टात टीकवलं, सुप्रीम कोर्टात टीकवलं, ते आरक्षण घालवण्याचे काम सध्या मराठा समाजाचा पोळका आल्याचे दाखवत असलेल्या नेत्यांनी घालवल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीचे नाव न घेता केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायमुर्ती भोसले, चीफ जस्टीस ऑफ उत्तप्रदेश हायकोर्ट,अलाहबाद हायकोर्ट होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून कसा मार्ग काढायचा या संदर्भात शिफारसी करायला सांगितल्या होत्या. त्या समितीने शिफारसी केल्या होत्या,पण त्यातल्या शिफारशींची अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या सरकारने केली नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये ज्या मराठा तरूणांची निवड झाली होती, त्यांना एसी बीसीतून बाहेर पडावे लागले. त्यांच्यासाठी अधिसंख्य पद तयार करून सामावून घेण्याची मागणी होत होती, मात्र या मागणींकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pankaja Munde : शिवशक्ती परिक्रमा यात्रा काय? पंकजा मुंडे कोणत्या जिल्ह्यात फिरणार?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरु केली. मुख्यमंत्र्यांनी हिम्मत दाखवली आणि निर्णय़ घेतला आणि महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठा तरूणांना अधिसंख्य पद तयार करून समावून घेतले. हे शिंदेंच्या सरकारने केल्याचे फडणवीसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
मराठा समाजासाठी ‘हे’ निर्णय़ घेतले
देवेंद्र फडणवीसांनी पुढे मराठा समाजासाठी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. आमच्या सरकारने केवळ आरक्षण दिले नाही, ज्या ज्या ओबीसी समाजाला सवलती दिल्या आहेत, त्या त्या सवलती मराठा समाजाला दिल्या आहेत. शैक्षणिक फी, बंद पडलेलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण पुन्हा सुरु केलं. या महामंडळाच्या माध्यमातून 70 हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना 5 हजार कोटीचे कर्ज दिले आणि याचं संपूर्ण व्याज सरकार भरते आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्याला ओबीसीप्रमाणे खाजगी कॉलेजमध्ये 504 कोर्सेसच्या प्रतीपुर्ती आपण केली.एकूणच आजपर्यंत मराठा समाजासाठी जे निर्णय घेतले ते महायुती सरकारने घेतल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
मराठा समाजाची दिशाभूल करता येणार नाही. थातूर मातूर करून हात झटकता येणार नाही. कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सूरू असल्याचे देखील शेवटी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT