गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचं थेट दर्शन सुरू, पंढरपूर मंदिरात भाविकांचा मेळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्याचा आले. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी दर्शन रांगेत भाविकांनी गर्दी केली आहे. आज पहाटे सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे गुलाब पुष्प देवून आणि त्यांच्यावर फुलांची उधळकरत स्वागत केले.

ADVERTISEMENT

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दोन नंतर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देव आणि भक्तांची भेट झाली.

विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळाल्याने भाविकांच्या चेहर्यावरून आनंद ओसांडून वाहत आहे. तर काही जणांचे अश्रू अनावर झाले.

हे वाचलं का?

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. आजच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे चरण दर्शन सुरू झाले आहे. याच निमित्तानं विठूरायाचं संपूर्ण देऊळ हे फळांच्या मांडवान सजले आहे. देवाचा गाभारा रुक्मिणी मातेचा गाभारा चौखांबी याठिकाणी सफरचंद डाळींब अननस यासारख्या फळांनी आणि फुलांनी संपूर्ण मंदिर सजवले आहे. मंदिरातील सजावटीमुळे देवाचे रूप आणि मंदिर खुलून दिसत आहे. ही सजावट पुणे येथील भाविक नानासाहेब मोरे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

देशात कोरोनाचे संकट सुरु झाले आणि 17 मार्च 2020 पासून विठ्ठल मंदिर बंद झाले होते . यानंतर नंतर मंदिर खुले झाले तरी निर्बंधामुळे विठुरायाचे दुरून दर्शन घ्यावे लागत होते . आता कोरोनाचे संकट संपत असताना ठाकरे सरकारने गुढी पाडव्याच्या साडेतीन मुहूर्तावर निर्बंध मुक्तीची गुढी उभारल्याने विठ्ठलभक्त आणि विठुराया यांच्यातील दुरावा संपला आहे . कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे संपले नसल्याने विठ्ठल भक्तांना खबरदारी म्हणून मंदिरात येताना तोंडावर मास्क लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT