Satara: कोयना धरणातून आजपासून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
सातारा: मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर कायम असल्याने सातारा जिल्ह्यातील (Satara) कोयना धरणाच्या (Koyna Dam) पायथा वीजगगृहातून आजपासून (18 जून) पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जाणार असल्याने कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळेच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. महाबळेश्वर, […]
ADVERTISEMENT
सातारा: मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर कायम असल्याने सातारा जिल्ह्यातील (Satara) कोयना धरणाच्या (Koyna Dam) पायथा वीजगगृहातून आजपासून (18 जून) पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जाणार असल्याने कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळेच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
महाबळेश्वर, नवजा, कोयनेसह पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणात प्रतिसेकंद सरासरी 41 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
Mumbai Rains: मुंबईसह राज्यात पावसाचा धुमाकूळ, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अगोदरच कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
त्यातच आता पायथा वीजगृहातून पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या लोकवस्ती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजनांबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनासह महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, पुढील 24 तासात पुन्हा सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस इथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलं
दरम्यान, सातारा जिल्ह्याला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस काल रात्रीपर्यंत बरसत होता. जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.कराड तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला असून संपूर्ण तालुक्यात सरासरी 88.7 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
समुद्रात बुडणाऱ्या बोटीवरील १६ खलाशांना वाचवण्यात यश, रेवदंडा येथे Cost Guard चं रेस्क्यु ऑपरेशन
कराडमधील सुपनी, कोपर्डे हवेली मंडल या भागात तर पावसाने जवळपास शतक गाठलं. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यानंतरही पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे अनेक गावांमधली जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळालं. कराड, मलकापूर, सैदापूर, उंब्रज, शेणोली, उंडाळे, काले, सुपने या सर्व भागांमध्ये 85 ते 99 मि.मी. च्या घरात पावसाची नोंद झाली.
या पावसाचं पाणी पुणे-बंगळुरु महामार्गावर आल्यामुळे काहीकाळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास निर्माण होऊ शकणाऱ्या धोकादायक परिस्थितीचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT