अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३२०० बाईक्स तपासत डोंबिवली पोलिसांनी विकृत नराधमाला केली अटक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमन यादव असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीच्या शोधासाठी डोंबिवली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत तब्बल ३२०० बाईक्स तपासून आरोपीला जेरबंद केलं. नेमकं काय घडलं होतं? डोंबिवलीतल्या एका हाय प्रोफाईल एरियात एक लहान […]
ADVERTISEMENT
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमन यादव असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीच्या शोधासाठी डोंबिवली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत तब्बल ३२०० बाईक्स तपासून आरोपीला जेरबंद केलं.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं होतं?
डोंबिवलीतल्या एका हाय प्रोफाईल एरियात एक लहान मुलगी जिन्यातून खाली उतरत असताना, तिला एका तरुणाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या लहान मुलीला आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आल्याचं लक्षात येताच तिने तात्काळ घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. घरातली लोकं या तरुणाला पकडण्यासाठी बाहेर पडले परंतू तोपर्यंत हा तरुण पसार झाला होता.
हे वाचलं का?
पोलिसांत तक्रार दाखल, तपासाला सुरुवात –
मुलीच्या पालकांनी या घटनेबद्दल मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. ही घटना घडली त्या भागात सीसीटीव्ही असल्यामुळे तो मुलगा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. परंतू या तरुणाने डोपी आणि मास्क घातल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अशावेळी आरोपीला पकडायचं कसं हा प्रश्न पोलिसांसमोर होता. यानंतर पोलिसांनी याच भागातील आणखी काही सीसीटीव्ही तपासले असता तोच तरुण इतर भागात काही मुलांना लक्ष्य करण्यासाठी आलेला असताना त्याची काळ्या रंगाची युनिकॉन बाईक सीसीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि पोलिसांना पहिला धागा सापडला.
ADVERTISEMENT
३२०० बाईकचा तपास –
ADVERTISEMENT
तपास अधिकारी अविनाश वनवे यांनी आरटीओमध्ये संपर्क साधून डोंबिवलीत किती जणांकडे युनिकॉन बाईक आहेत याची तपासणी केली असता, त्यांना शहरात १० हजार जणांकडे युनिकॉन बाईक असल्याचं कळलं. यापैकी काळ्या रंगाची युनिकॉन ही ३२०० जणांकडे असल्याचं पोलिसांना समजलं. सोनारपाडा परिसरात ८० जणांकडे काळ्या रंगाची युनिकॉन असल्याचंही पोलिसांना या तपासात समजलं.
औरंगाबाद : पाकिस्तान सुपर लिगमधील सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या ७ जणांना अटक
परंतू सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे आणखी एक धागा पोलिसांच्या हातात आला होता. विनयभंग केलेल्या तरुणाच्या बाईकचा इंडिकेटर तुटलेला असल्याचं पोलिसांना माहिती होतं. यानंतर पोलिसांनी शिताफीने ही इंडिकेटर तुटलेली बाईक शोधून काढली आणि ती गाडी नेमकी अमन यादवचीच निघाली.
फोटो स्टुडिओमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांकडून बलात्कार
पोलिसांनी यानंतर तात्काळ अमन यादवला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अमनने याआधीही अशाच पद्धतीने कोणत्या मुलीची छेड काढली आहे का याचा तपास करत आहेत.
शंका आली म्हणून घरातील सोफा बघितला अन् शेजाऱ्यांना धक्काच बसला; डोंबिवलीतील घटना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT