Underworld Don अरूण गवळी दगडी चाळीत परतणार, कोर्टाकडून पॅरोल मंजूर
योगेश पांडे, नागपूर कुख्यात डॉन अरुण गवळीला पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला पॅरोल मंजूर केला आहे. तब्बल 28 दिवसांसाठी त्याला ही संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. अरुण गवळीने आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि कौटुंबिक कोर्टात पॅरोलचा अर्ज केला होता. जो कोर्टाने मान्य केला आहे. त्यामुळे आता पुन्हा […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
कुख्यात डॉन अरुण गवळीला पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला पॅरोल मंजूर केला आहे. तब्बल 28 दिवसांसाठी त्याला ही संचित रजा मंजूर करण्यात आली आहे.
अरुण गवळीने आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि कौटुंबिक कोर्टात पॅरोलचा अर्ज केला होता. जो कोर्टाने मान्य केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अरुण गवळी हा 28 दिवसांसाठी आपल्या दगडी चाळीत परतणार आहे.
हे वाचलं का?
अरुण गवळी हा शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला जेलमधून संचित रजेवर सोडण्यात आलेले आहे.
कोण आहे अरूण गवळी?
ADVERTISEMENT
अरूण गवळी हा कुख्यात डॉन आहे. 80 आणि 90 च्या दशकात अरूण गवळीची मुंबईत दहशत होती. मध्यप्रदेशातल्या खंडवा येथून अरूणचे वडील गुलाब गवळी हे मुंबईत आले होते. घरातली आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अरूण गवळीने शाळा सोडली. वडिलांना मदत व्हावी म्हणून अरूण गवळी सुरूवातीला दूध विकण्याचंही काम करत होता.
ADVERTISEMENT
मात्र 1980 मध्ये रामा नाईक गँगशी अरूण गवळी जोडला गेला. त्यानंतर तो दाऊदसाठी काम करत होता. 1993 मध्ये जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा अंडरवर्ल्डचं सगळं समीकरणच बदललं.
बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईत पळून गेला होता. दाऊद आणि छोटा राजन वेगळे झाले होते. छोटा राजनने त्याचा व्यवसाय मलेशियात सुरू केला होता. यानंतर अरूण गवळीने त्याचं गुन्हेगारी साम्राज्य मुंबईत उभं केलं होतं. सुरूवातीला अरूण गवळीने त्याचा सगळा कारभार दगडी चाळीतून सुरू केलेला.
‘डॅडी’ची ‘दगडी चाळ’ नेमकी आहे तरी कशी?, पाहा Exclusive फोटो
अरूण गवळीला त्या काळी शेकडो गुंड येऊन मिळाले होते. त्यानंतर गुंड अरूण गवळीचा डॉन अरूण गवळी झाला होता. पण कालांतराने तो राजकारणात सक्रीय झाला होता. त्यावेळी तो आमदार म्हणून देखील निवडून आला होता.
मात्र, शिवसेनेचे नगरसेवक जामसंडेकर यांची हत्या घडवून आणल्याप्रकरणी अरूण गवळीला याला कोर्टाने शिक्षा जन्मठेपेची सुनावली. तेव्हापासून तो नागपूरच्या कारागृहातच शिक्षा भोगत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT