धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना! फडणवीस म्हणाले, ‘मी आधीच सांगितलं होत की…’
Devendra Fadnavis। election commission allots shiv sena symbol to eknath shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवार मोठा दिवस ठरला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मोठी लढाई जिंकली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis। election commission allots shiv sena symbol to eknath shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवार मोठा दिवस ठरला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मोठी लढाई जिंकली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचं अभिनंदन केलं, तर उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथराव शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना विचारांची शिवसेना आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
“त्यांनी (ठाकरे गट) दोन स्क्रिप्ट तयार करून ठेवल्या होत्या. निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, तर निवडणूक आयोगाने खूप चांगलं आणि निष्पक्षपणे काम केलं आहे. विरोधात निकाल गेल्यानंतर दुसरं टाईप करून ठेवलं होतं की, निवडणूक आयोग दबावाखाली आहे. ते त्यांच्या स्क्रिप्टनुसार चालत आहे. पण निवडणूक आयोग असो वा सुप्रीम कोर्ट हे कायद्यानुसार चालतात आणि न्यायाने चालतात”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र डागलं.
हे वाचलं का?
Shiv Sena: उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाच!
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग यामुळे मोकळा झाला का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता, त्यावर फडणवीस म्हणाले, “यासंदर्भात मुख्यमंत्रीच सांगू शकतात, तो अधिकार असतो.”
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis: “नागपुरात भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका”, फडणवीस भाजप नेत्यांवरच भडकले!
ADVERTISEMENT
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. @mieknathshinde
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 17, 2023
फडणवीसांचं ट्विट, शिंदेंचं अभिनंदन…
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर फडणवीसांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात ते म्हणतात, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT